Skip to main content

Posts

Showing posts from September, 2020

T breack

चहा देखील एकत्र बसून  पिण्यात मजाच वेगळी  चहा आणि गप्पांची मैफिल  म्हणजे रंगतच आगळी चहा चा पहिला कप  पूर्ण वाळला पाहिजे.. हो हो...अर्धा कप चालेल म्हणून  पुढची ऑर्डर निघालीच पाहिजे.... तळाशी राहिलेली ती पूड म्हणजे जणू... चव नसलेला चोथा असतो... तसच काहीसं विषयाला विषय निघतात पण त्याला कधी शेवट च नसतो.... काही म्हणा त्या चहा ची लज्जतच न्यारी... त्यात पण असते एक नशा भारी.. अद्रक,वेलची,सुंठ चहा चे दोस्त असतात ... बोले तो ..🤘☕ एक कटिंग  एक चिअर्स   एक नशा  एक टपरी हसण्यावारी नेऊ नका ह.. तिथूनच एखादा..पुढे जाऊन बनेल देशाचा *प्रधानमंत्री* 🙏 मानसी गोरे चहा आवड समिती.

work from OR for... Home

आजच्या विषयाला धरून एक विचार मांडते✒️   " *Work from Home *" असा इंग्लिश शब्द वापरला की खूप मोठं काही तरी केलं का?..  तर तस नाही  ..काही का होईना काम चालू राहील आणि incom देखील बरोबर ना.......❓ (मत चूक किंवा बरोबर काही असू शकत) मग मला सांगा वर्षानुवर्षं घरात राहून... जी काम करते .. तिला काय पदवी? तिचा पगार कुठे? तीच स्थान काय? तर उत्तर हे की.... ती घरातच असते सो कोल्ड भाषेत बोलायचं तर....  * House wife* 🏠. वर्क फ्रॉम होम, लॉक डाऊन हे सगळे शब्द तिच्या साठी नवीन नाहीयेत .... तुम्ही कामावर गेलात  की घरात ती लॉक डाऊन च असते .. आणि वर्क फ्रॉम होम सुरू होत . केला ह्याचा विचार..  बाहेर जाऊन काम करून येता... घरासाठी पैसे कमवता... पण आज ज्यावेळी हॉटेल बंद झाली... पोळी भाजी केंद्र बंद झाली... तेव्हा हीच होती... जी work from home नाही तर ... Work for home ....  करत होती. मग परिस्थिती प्रमाणे... भांडी, धुणं, केर ,फरशी सगळंच   * फॉर होम* साठी चालू होतं. * जिच्या वर इतके जोक करता ...* ती तर दिवसभर घरात एकटी असते किंवा तुमच्या आई बरोबर (अभिप्रेत ..सासू,ती...

Adhik-mas...एक संस्कृती

  .. आईला जाऊन तशी अडीच वर्ष  होऊन गेली,    ....१८ सप्टेंबर आईचा वाढदिवस असायचा .... अधिक महिना सुरू होणार माहीत होतं ....म्हणून ठरवून आज च हे लिखाण. .......ह्या आधी मागचे जे दोन अधिक मास होऊन गेले त्या अधिक मासाची ही गोष्ट.    त्यावेळी माझ्या मनात मेहुण जेवाणाचा विचार  आला,  घरात बोलून दाखवला..  का करतात ते सांगितलं,  त्याच महत्व काय ते सांगितलं.. ...  अहो आणि पोरांनी संमती दिली,  एक विडा सगळ्यांनी उचला.  ....घाट घातला खरा,  कमीत कमी ३३ जोडपी तरी यायला हवीत.   लेक जावई, नातेवाईक, मैत्रिणी त्यांचे अहो असे सगळेच मिळून ३३ मेहुण तरी व्हायला पाहिजेत       हे नक्की ठरवलं होतं की पूर्ण जेवण हे आपलं महाराष्ट्रीयन असेल(दुसऱ्या कुठल्याही पदार्थाला ताटात जागा नाही, हा अन्नाचा अपमान नाही तर आपल्या खाद्य संस्कृती चा मान होता.)..       तसेच अजून एक गोष्टीचा आग्रह होता तो म्हणजे पंगत असेल, भले टेबल खुर्ची वर... पण बुफे नाही.      आपल्याकडे येणारी जोडी ही  ...

lokcdown...ek baju devachi.

आणि लॉक डाऊन सुरू झालं... एक एक दिवस सरकू लागला... भिती आणि काळजीने घर घर वाढू लागली.. काही म्हणून सुचेना... सगळ्या गोष्टी बंद बंद बंद.... दुसरा उपायच राहिला नाही... बंद मधे देवळातील देव देखील सामील झाले... देऊळ ओस पडली..  एक नाही अनेक तोंड बोलू लागली... 😢😢 आणि मग एक कल्पना, एक विचार ....  मनातील कवीला वाटून गेला.. लेखणीने विचार मांडले गेले... अस वाटलं जशी आपली बाजू तशीच देवांची पण बाजू असू शकते.. म्हणून........... "देवांनी पण रजेचा अर्ज टाकला " "माणूस मात्र त्यावर सही करायला विसरला" "त्यांच्या रजेला मंजुरी काही मिळत नव्हती" "कारण आपली गाऱ्हाणी च कुठं सपंतच होती" "देवांच पण गणगोत,मित्र परिवार असेल" "संदेश आणि व्हिडिओ कॉल फक्त डोळे बंद करून होत असेल" "एकमेकांना वेळ आणि स्पेस द्यावीशी वाटत असेल" "भटकायला कुठे तरी जायचं असेल" "रखुमाईला आपल्या माहेरची ओढ लागली असेल" "गणरायाला दरवर्षी पृथ्वीवर येऊन बोर झालं असेल"... "शिव पार्वतीच्या मागे लागून शांत ठिकाणी जायचं असेल" "देवींनी...

Teacher's Day...आयुष्याच गणित

गुरू शिकविता........  ।।रंगसंगती... घे रंग भरुनी आयुषाच्या सारिपाटावर।। गुरू शिकविता..... ।।गायन,वादन... सूर घे जिव्हाळ्याचे साऱ्या घेऊन। गुरू शिकविता...... ।।इतिहास,भूगोल...  नकोस विसरू कोणाचे ऋण,  अवतीभवती चे हे जग सुंदर।। गुरू शिकविता...... भाषा मराठी आणि शास्त्र... घे वसा मायबोलीचा, कर नाव उज्वल करून प्रयोग विज्ञानाचा गुरू शिकविता...... ।बेरीज,वजाबाकी...ने सांगड  घाल आयुष्याची ।। ।।कर दुःखाचा भार कमी ...करून भागाकार,,,  द्विगुणित होण्या आनंदाचा ...कर गुणाकार।। ।।ज्यास उमगले  जीवनाचे हे समीकरण।। ।।सुखी जाहला तो या जगण्यातून।। 🙏🙏🙏🙏🙏