Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

Dry fruits......आणि नाती🤝

गौरी गणपती चा सण म्हटलं की ..प्रसादाला किंवा देवाला अर्पण करायला  सुकामेवा सगळी कडे दिसायला लागतो..... म्हणून आपलं वाटलं त्यावरच थोडं लिहून बघावं... थोडा मेवा खाऊन..सुका ने..sorry🤗सुखाने रहावं. हे बदामा सर्वाना चांगली बुद्धी दे... हे पिस्त्या सर्वाना भरपूर एनर्जी दे.. हे मनुका सर्वना रक्तवाढीचा गुण दे... हे काजू सर्वाना पचन क्रियेला मदत दे... हे आक्रोडा सर्वाना हाड आणि हार्ट ला मजबूती दे.. हे बेदाण्या सर्वाना मधुरता आणि शीतलता दे... हे अंजीरा सर्वाना मनाचा थकवा दूर करून उत्साह दे... किती चांगले गुण प्रत्येक जण देतोय अति सेवन केल तर...अवगुण च भोगतोय तसच काहीसं... नात हे ड्रायफ्रूट सारख असावं.. किती खायचं ते आपणच ठरवावं.. चांगलं तेवढ घेऊन... बाकीच सोडून द्यावं.... अति तेथे माती जस हे खरं आहे.. नात देखील जपून वापरायची सुगंधी कुपी आहे... एक भक्कम आधार नात्याला देऊ.... जेव्हा...योग्य प्रमाणात Dryfruit खाऊ☺️☺️

एक Bandish...अनंतात विलीन

मागच्या आठवड्यात "प्राइम व्हिडीओ app" डाऊनलोड करून घेतला  शकुंतलादेवी पिच्चर बघण्यासाठी ...लॉक डाऊन मधे हे नवीन add झालं बरका      अशीच app वर नजर फिरताना... "Bandish Bandits" ह्या वेबसिरीज वर गेली (अरे बापरे मलाच खूप मोठे शब्द वापरतोय अस वाटतंय.. Web series and all... हा हा हा) रिलीज होऊन 10,12 दिवस झाले आहेत.मी रविवारी  दिवसभरात  त्याचा फडशा पाडला....... पुढे काय हे तर वाटतच होत.  छान काहीतरी रमणीय डोळ्याला बघायला आणि  मुख्य म्हणजे तितकंच श्रवणीय देखील. राजस्थान च लोकेशन, देऊळ,वाळवंट,हवेली... आहा.. सुंदरच👌👌 सगळ्यांचे घेतलेले पेहनाव,ज्वेलरी..क्या बात     आताची पिढी आणि मागची पिढी ह्याच फ्युजन दाखवलं आहे.... कुठे ही संस्कार, रीतिरिवाज, घराणेशाही ला धक्का न लावता सिरीज पुढे पुढे जाते.     आणि हो मुख्य म्हणजे... अशा पिच्चर म्हणा किंवा आताच्या वेब सिरीज  मधे  आपला कोणी मराठी चेहरा असेल तर मला भारी वाटत ह.....काही म्हणा. आपला मराठी बाणा जागा असतोचच तो अजून भाव खाऊन जातो....अतुल कुलकर्णी हे नाव.. ...

Gokulashtmi

  काल नवीन उदबत्ती चा पुडा आणिला  त्याचा एक झोपाळा बनविला...   काठ  खणाचा  लावला त्यावरती दोरा करोनी रंगीत ..केशरा पासोनी  तो लाविला झोपळ्याची दोरी म्हणोनी. ... तुळस  माझ्या गॅलरी च्या अंगणातली  सुईदोरा घेऊन एक माळ गुंफली खरी फुल नाही मिळाली मग काय ..घरातील खोटी च फुल वापरली.... वरून थोडं अत्तर शिंपडल सुगंधाच थोडं साम्राज्य पसरल... रांगोळी च्या चार ओळी काढून पाहिल्या नकळत मोरपीस हातातून निसटल.. धूप,दीप,नेवैद्य...झाला हलकेच एक झोका गोपाळ कृष्णाला दिला......☺️😘🙏 निज माझ्या नंदलाला, नंदलाल रे.....  बाळा जो जो जो रे ************************* आणि अशा प्रकारे माझा गोपालकृष्ण सजून झोपाळ्यावर बसला😊😊

Shambhar varsha purvi....

आज  जाहली  100वर्षे  पूर्ण  अनंतात विलीन होऊन..... नांव असे स्वातंत्र्यविराचे "केशव गंगाधर टिळक" किर्तीस आला  *बाळ*  नाव घेऊन..... रत्नागिरी जिल्हा,दापोली तालुका.. चिखली गावात जन्म घेतला गंगाधर-पार्वती दाम्पत्या पोटी..... लहानपणी अन्याय सहन न करणे  आणि कुशाग्र बुद्धी... "मी शेंगा खाल्या नाहीत मी टरफल उचलणार नाही"....इथं पासून "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" ....इथं पर्यँत लहान वयात हरपले   मातेचे छाया छत्र..... वय वर्ष सोळा, विवाह बंधनात अडकले दहा वर्षाच्या तापीबाई समवेत पित्याचा आशिर्वाद मिळाला मात्र... पोहणे,व्यायाम करणे,नौका चालवणे.. संस्कृत आणि गणित विषय आवडणे.... काही दिवस शिक्षकी पेशा  पैशासाठी निवडणे... B.A. , L L B पदवी घेता जागी झाली देशभक्ती.... इंग्रज सरकार राज्य खुपू लागले वाटू लागले का असावी अशी ही सक्ती.... घेतला वसा स्वातंत्र्याचा सामान्य लोका समजावे म्हणून.....  केली उभारणी शाळा,कॉलेजची परखड पणे मते मांडली  मराठा व केसरी वृत्तपत्रातून..... समाजातील दोन्ही पिढ्या असाव्या एकत्र...