Skip to main content

Posts

Showing posts from July, 2020

"नागपंचमी"...एक सण..एक कथा

संपूर्ण चातुर्मास नागपंचमीची कहाणी,   ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण कुटुंब रहात होत. त्याकुटुंबात पाच सुना होत्या.  श्रावण महिना आणि नागपंचमीचा दिवस म्हणून.. कोणी आपल्या आजोळीं, कोणी आपल्या पणजोळी, कोणी माहेरीं.. सर्व सुना गेल्या होत्या.  सर्वांत धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीचं नव्हतं. तेव्हां ती जरा खिन्न झाली व मनांत माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून, नागोबा मला माहेराहून न्यावयास येईल, असं म्हणूं लागली. इतक्यांत काय झालं? शेषभगवानास तिचीं करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला. त्या मुलीला नेण्याकरितां आला. ब्राह्मण विचारांत पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला? व आतांच कुठून आला? पुढें त्यानं मुलीला विचारलं. तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं, ब्राह्मणानं तिची रवानगी केलीं. त्या वेषधारी मामानं तिला आपल्या वारुळांत नेलं, खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवा बसवून आपल्या बिळांत घेऊन गेला. आपल्या बायकांमुलांना ताकीद दिली कीं, हिला कोणीं चावूं नका. एके दिवशीं नागीण बाळंत होऊं लागली, तेव्हां हिला हातांत दिवा धरायला ...

"जग हे बंदिशाळा"....असच होऊन बसलंय

     "जग हे बंदिशाळा"... 🎶🎶 हे गाणं खरंच सत्यात उतरलय अस वाटतंय...  बघता बघता चार महिने उलटून गेले ह्या लॉक डाऊन ला....   कुठून तो रोग आला ... काय तर म्हणे कोरोना  (मुडदा बशवीला त्याचा)..😡...खरंच अस म्हणायची वेळ आली आहे. कोण करतय आणि कोण भोगतय... अस सगळ्या जगाचं झालं आहे. कधी वाटलंच नव्हतं ..अस संकट एकदम सगळी कडे येईल, ...आणि होत्या च नव्हतं होईल. बर अजून पुढे काय वाढून ठेवलंय हे ही माहीत नाही.  हे अस.. कुठपर्यँत आणि किती चालणार. माणसांची सहन करण्याची शक्ती खरतर संपत आलीये.   धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय अशी परिस्थिती होऊन बसलीये. रोज काही तरी नवीन अनुभव, किस्से ....ऐकायला, बघायला मिळतायत. चांगले,वाईट सगळं आहे त्यात. जितकी माणसं,कुटुंब तितक्या समस्या वाढत आहेत, हे नक्की. आणि मनुष्यधर्माच्या स्वभावा नुसार..  प्रत्येक जण  दुसऱ्याला नाव ठेवतो आहे.(समजलं असेलच कोणाला उद्देशून हे लिहल आहे..शहाण्यास शब्दाचा मार) खरतर आताची परिस्थिती खूप अवघड आणि न समजणारी आहे.... काय करायचं हे ठरवायच्या आत शत्रू आपल्या हद्दीत शिरला ...

"दीप अमावस्या"

आजचा  ब्लॉग हा ह्याच विषयावर  लिहला पाहिजे... ।। दिव्या  दिव्या  दिपत्कार ।। ।।दिव्याला पाहून नमस्कार ।।🙏  आपल्या  सगळ्यांन  कडे  एक पोस्ट येत  होती... आली असेलच . ती अशी की...आजच्या दिवसाला  गटारी गटारी म्हणू नका.. खरतर  आजचा  दिवस  "दीप अमावस्या" म्हणून आपल्या संस्कृती मधे  पूर्वापार  चालत आला आहे...दिव्याला खूप महत्व दिले आहे. म्हणून अस वाटलं....    ह्यावेळी  हे  बर  झालं  की ज्याला जो काय धिंगाणा घालायचा आहे त्यासाठी रविवार  मिळाला   आणि   आज आपल्याला   " सोमवती दीप अमावस्या "  मिळाली. दिव्यांनी ओवाळणे हे सौख्याच प्रतीक मानलं जातं...  इतिहासात देखील लढाईला निघालेला योध्या असो एखादा विजय संपादन केलेला ...तसच पाडवा, भाऊबीज, पंचाहत्तरी, सहस्त्र चंद्र दर्शन, किंवा आपल्या बाळाचा पहिला वाढदिवस.😘 मोबाईल मधील फोटो मुळे वेगवेगळ्या दिव्यांची  मांडणी  बघायला  मिळाली, दिवे बघायला मिळाले..... छान वारसा पुढे जातोय हे नक्...

मनःशांती..दृष्टिकोन आपला,नजर आपली.

आज गेले होते खरेदीला ला.. " मनशांती" कुठे मिळते का ते बघायला... ********************** एक दुकानदार म्हणाला, "आमच्या कडे नाही.. त्या समोरच्या दुकानात विचारा" तिथे जाऊन चौकशी केली तर.. दुकानदार  हसून  म्हणाला .. " अस  काही विचारा जे  समजेल  मला" *********************** अशी दोन चार दुकान शोधून झाली.... मनशांती कुठेच नाही मिळाली.. *********************** अचानक ....... एका दुकानाच्या बाहेर लिहली होती पाटी  फक्त नाव सांगा  पाहिजे ते मिळेल. ...... वाचून खूप आनंद झाला😊 विचारून तर बघू  आहे की नाही  हे तरी कळेल.... ******************* दोन पायरी वर गेल्यावर दुसरी पाटी दिसली 😊 हसत मुखाने आत या " लिहल होत त्यावर"   बाहेरच  ठेवा  तुमचा  "राग  आणि  तेवर "😡🤨 *********************** वाचून थोडा विचार केला बघू तरी करून..... चप्पल👡बरोबर काढून ठेवला   मनाचा एक  टोचणार त्रिकोण....🔺 ********************* दार आत ढकला  लिहल होत  पुढच्या पाटीवर...⤴️ मनाचा पण कप्पा   हलकेच उघडा  आपल्या ...

एक झाड आनंदाचे🌳

एक राज्य होत..... राजा राणी आपल्या प्रजेची खूप काळजी घेत होते.   प्रेमाने आणि जबाबदारीने . त्यामुळे प्रजा एकदम सुखी होती. राज्यात एक आनंदाचा झाड होत.🌳 त्या राज्यातील प्रजेनीच ते झाड लावलं होत. फक्त त्याला नियम असा होता की,  प्रत्येक घरातील कुणीतरी  विहिरीवरून पाणी काढून आणायचं  आणि झाडाला घालायचं.  आनंदाने सगळे जण करत होत आणि  झाड आनंदाचे झाड म्हणून  फुलत होत,वाढत होत....☺️ त्याच एक वैशिष्ठ ,अस की... फळ आणि फुल पण एकदमच बहरत होत.    फुलांचा गधं वेगळाच होता....🌺 फळाला एक वेगळीच गोडी होती ...🍑 बघता बघता...त्या रोपट्याच रूपांतर एका भल्या मोठ्या वृक्षांत झालं.🌳🌺🍑 झाडाला विहरीवरून पाणी आणून घालण्याची प्रथा वर्षानुवर्षे चालू होती. थोड्या दिवसांनी प्रजेला एकदा जाणवलं.. फुलांचा सडा पडायचा....पण एक फुल उचल आणि त्याचा वास घेतला की त्या व्यक्तीची एक छान आठवण विसरली जात होती.🤔🤔 एक फळ खाल्लं की...... सुखाचा एक क्षण कमी होत होता...😔😔 राजा राणीच्या महालात ही बातमी गेली. दोघांना  ही हे खरं वाटत नव्हतं... म्हणून ते त्या झाडा पा...

आपण मात्र हतबल झालेले असतो...

एक होत गाव...🌄 त्याला नव्हतं नाव.... काय होत अस त्या गावात....🏘️ सगळंच मिळायचं एकाच भावात.... कुणीकुणाशी भांडत नव्हते....🗣️ चुगल्या करून कान भरत नव्हते.....👂 कुणीच कुणावर लादत नव्हत.. ओझअपेक्षांच जगत जगत म्हणत होते..  गाणं साधेपणाच🎶 पण एकदा काय झालं...🕵️ नवीन कुणीतरी entry मारली ...🧟 होत्या च नव्हतं झालं जणू त्या गावाला  दृष्टच की ओ लागली... जेव्हा ऐकण्याचा आणि पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो...😡 डोळस माणसाला देखील आंधळा  करून टाकतो...😎 काय होत  ह्याचा   माणूस  विचारच  करत  नाही..  सगळं किती चांगलं..  *होत*... समोर जे दिसतय त्याला सगळं बहाल करून *टाकत*...😔 वेळ मात्र निघून जाते..⏳ Entry मारलेला ... सहज मधे निघून गेलेला असतो..😈 कारण त्याच काम झालेलं असत... आपण मात्र हतबल झालेले असतो.... जग लांबून बघत असत..... कोणी तरी मजा घेत असत....  तर कोणी आपल्या साठी दोन अश्रू गाळत असत... आपण मात्र हतबल झालेले असतो 😌😌

आहे त्यात सुखी राहू...

।।आयुष्य किती छान होत।।😇  ।।येण जाण किती सोप होत।।🏃 ।।काहीच नियमांच पालन नव्हत।।🚦 ।।की मनात कशाचं भय नव्हत।।.....🐲 ।।मनात आलं की भेटून गप्पा गोष्टी करत होतो।।☕ ।।पिच्चर,हॉटेलिंग आणि शॉपिंग एकाच दिवशी आटपत होतो।।🧥🥼👠👜🕶️ ।।लॉंग ड्राईव्ह ची मजा घेत  होतो।।🚙 ।।सहज मधे भाजी ला उतरल की पाणी पुरी खात होतो।।🥦🥕...🍴 ।।आपल्या काम वाली बाई ला..येणार नशील तर आधीच सांग अस सांगत होतो।।👩‍🦰 ।।कधी तरी धुणं, भांडी,केर आणि फरशी आनंदाने करत होतो।।🧹🧽🧴 ।।महिन्याच्या घर खर्चातून थोडे थोडे पैसे वाचवत होतो।।😛 ।।भिशी आणि मैत्रिणी मिळून  गप्पांची  मैफिल रंगवत होतो।।😄😄 ।।खर तर साधं पण छान आयुष्य जगत होतो।।..😇 ..आता काय🤭🤔 ...आता अस वाटतंय..एकमेकांना भेटायला तरसलो आहोत...कधी एकदा गाठ पडतीये खरतर अस झालं आहे....ह्या पुढे मला वेळ नाही असं म्हणू नका...आणि नसेल ते कारण देऊन उगाच च एकमेकांना टाळू नका.. ह्या कोरोना नी काय शिकवलं ते कधीच विसरू नका....👹 जातपात त्याने ठेवलेच नाही.. गरीब श्रीमंत भेदभाव केलाच नाही... हाल काय असतात हे पण दाखवून दिलं...😓 आणि तुमच्या कडे काय...

गोड बोलून तर बघा...

🍫 Happy Chocolate Day🍫... 🍫 Happy Chocolate Day🍫... "कुछ मिठा हो जाय" ऐकतानाच किती गोड वाटतंय ना.  तर आजचा विषय  "गोड"  ह्यावर थोडं लिहिते. गोड खाणारे दोन गट ह.. एक म्हणजे बिनधास्त गोड खाणारे..🤪 आणि दुसरे अगदी एकच बाईट,म्हणजे एकच घास 😊 ह्या चॉकलेट प्रकारात तसे बरेच प्रकार... मिल्क पासून बिटर चॉकलेट पर्यंत   (तरी ते आपण गोड मानून खातो) का अस होत असेल.. तर त्या ब्रँड ने केलेली  Ad....  आणि  tag line  मुळे....  जाहिरात , एखादा DAY  आपल्या मनावर,मेंदूवर कब्जा करतो....  "कुछ मिठा बोला जाय" (100%शुगर वाढणार नाही😝) अस करून बघितलं तर... पण मग  त्यात सुधा दोन प्रकार येणार... "एक तोंडावर गोड बोलणारे" 😏   आणि    "एक दिलखुलास गोड बोलणारे"😄 बिटर चॉकलेट सुधा गोड मानून खातो, मग... बोलताना का कडू आणि राखून बोलायचं... जसे आपले सण आहेत ना तसेच मराठी डे पण व्हायला पाहिजेत.... कल्पना करा "मोदक डे"😋 "पेढा बर्फी डे"...😋 आणि .."🌾ऊस डे🌾"   Sorry, sorry "Sugarcane Day" ..त्याशिवाय ते  "🤘yo🤘...

मृगजळ

  जे जे गुरु स्थानी आहेत त्या सर्वांना प्रथम त्रिवार वंदन।।.....🙏🙏 उपदेश देणाराच गुरू असतो   अस नाही  तर  किती तरी वेळा आपल्या आजूबाजूला देखील, सहज मधे कोणी तरी चांगलं शिकवून जात ,सल्ला देत. एक आधार  मिळतो .... तो कुठल्या स्वरूपात मिळतो हे प्रत्येकाचे प्रत्येकाला च माहीत असत..... 👩‍🦰👨‍🦰 काळजी करणारे.. आपली जबाबदारी स्वीकारणारे.. आपल्या आवडी निवडी पूर्ण करणारे.. चुकलं तर वेळीच शिक्षा देणारे... चांगलं वाईट  सांगणारे... आपले पहिले गुरू   *आई वडील*  च असतात .... 👨‍🦰👩‍🦰 गर्भात असल्या पासून आई ला  बाळाची काळजी घ्यावी लागते...... आपल्या संस्कृती मधे म्हणूनच गर्भ संस्कारा ला महत्व दिलं आहे...🤰😇 मग ह्यातूनच येणाऱ्या नवीन पिढीचा विचार मनात येतो... म्हणून... आज मी  थोडं new generation बद्दल लिहीणार आहे.... आज काल च वातावरणच बदल आहे,  काही  निसर्गाचे नियम बदले आहेत... उगाचच काहीतरी वेगळ्या कल्पनेत जगतिये नाविन पिढी. कामाचा नको एवढा ताण, फॅशन म्हणून व्यसन केलं जातंय.... मुला मुलींनो चुकीचा मार्ग निवडताय. मृगजळ हा शब्द ...

बैलपोळा-जबाबदारी एका मुक्या प्राण्याची.

🏘️आमच्या गावी एका शेतकऱ्याच्या घरात  घडलेली गोष्ट तुम्हाला सांगते. शेतकरी म्हटला की घरात कोंबड्या, गाईगुर असणारच.   राखणीला एखाद कुत्र पण असत.   मालक,घरातील माणस आणि हे प्राणी..  त्यांना एकमेकांची खूप सवय लागलेली असते.  एक प्रेम ,जिव्हाळा तयार झालेला असतो... (आपल्या शहरी भाषेत सांगायचं झालं तर *जबरदस्त  "Bonding"*...) तर एकदा काय झालं........... गुरांना चारा आण्यासाठी डोंगरावर जायला लागायचं.   मालकाने बैलांना  गाडीला जुंपल.  त्यातल्या एका बैलाच नाव होतं "चतुर"😊.  अस ऐकून आहे की खरंच तो अतिशय हुशार आणि प्रेमळ होता.घरातील कोणी पाया जवळ जरी बसल तरी काही करत नसे. ....जाताना गाडी मोकळी होती,त्यामुळे कदाचित ती पळायला हलकी असेल.  गाडी डोंगरावर पोचली.  मालकाने पूर्ण गवत तोडून चारा गोळा केला.  हळूहळू चाऱ्याने गाडी भरली,पेंढ्या तयार झाल्या.... तो पर्यंत हळूहळू अंधार पडायला लागला होता.  डोंगरावर एकच गाडी एका वेळेला जाईल अशी पायवाट होती. एकबाजूला तस दरी सारखाच की . गाडी घराकडे यायला निघाली, पुढे थोडं ...

।।देवाचिये द्वारी उभा क्षणभरी।।

मागचे बरेच दिवस आपण विठू रखुमाईच्या जणू आजूबाजूला वावरत होतो,  एकीकडे वारी होणार नाही माहीत होतं तरी  मन  भक्ती करायला कमी पडत नव्हतं....  tv वर भजन ,कीर्तनाचा आनंद घेता येत होता, कोण हरिपाठ वाचत होत,तर कोणी विष्णूसहस्त्र नाम रोज  न चुकता म्हणत होत,  कुणी आपल्या  ग्रुपवर काही धार्मिक वाचनाचा उपक्रम  हाती घेतला होता . एकादशी दुप्पट खाशी 😝...उपवासाच्या पदार्थांची रेलचेल चालू होती ,सगळीकडे वेगवेगळ्या कृती दाखवल्या जात होत्या.... त्यातून देखील कुणीतरी  विठुराया तयार केला😇 आपल्या आपल्या भक्तीने  कोणी चित्र रंगवलं, तर कोणी सुरेल आवाजात भक्ती संगीत ऐकवलं,  अभंगा वर नृत्य सादर केलं....आणि असा आपला दिवस त्या सावळ्याच्या  नामघोषात  पार पडला.... प्रत्येकानी एकच मागण मागितलं असणार  आहे हे नक्की🙏 आज उगीचच एकदम शांत वाटत.. थोडीशी उदासी येऊन जाते... समजत नाही ,पण ... एक रिकामपण  वाटत. आणि परत जेव्हा एखादा अभंग  कानावर पडतो किंवा गुणगुणला जातो ... की परत एक  *संजीवनी*  मिळाल्याचा आनंद होतो...😇 ।।...