।।माऊली,माऊली,माऊली..।। "या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला"...केशवदास ह्यांचा हा अभंग खरंच अनुभवास येतो जेव्हा पायी चालणाऱ्या वारीतले आपण एक वारकरी असतो. त्या विठोबा रखुमाईची ओढ लागलेली असते.... मी स्वतः हा अनुभवलेला अनुभव माझ्या शब्दात लिहिण्याचा एक प्रयत्न. आळंदी ते पंढरपूर ज्ञानेश्वर माऊलीची पालखी हा एक सुंदर प्रवास आहे... तसतर जे पायी पूर्ण वारी करतात ते अवघड,किचकट आणि वेदनादायी आहे...मात्र एक ओढ च ती पूर्ण करून घेते... खूप लिहण्या सारख आहे...माऊली माऊली माऊली शिवाय काही ऐकू येत नाही.. भजन,भारुड,कीर्तन याचा जयघोष चालू असतो. प्रत्येक दिंडी बरोबर त्यांचा ट्रक असतो ज्यात भांडी,अन्यधान्य, तंबू अस भरलेलं असत, आधीच तंबू कुठे करायचा ते ठरलेलं असत, आजच्या भाषेत बोलायचं तर परफेक्ट मॅनेजमेंट😊..... खऱ्या वारकऱ्यांच्या गरजा खूप कमी आहेत, माझ्यामते दोन,तीन जोडी च कपडे घेऊन येत असतील,तीच धून,वाळवून जिथे पाणी मिळेल आणि विहीर असेल तिथेच अंघोळ... गरजाच खूप कमी घेऊन येतात बरोबर..आणि त्या कमी ठेवल्या तरच तुम्ही 20,21 दिवस ...