चहा देखील एकत्र बसून पिण्यात मजाच वेगळी चहा आणि गप्पांची मैफिल म्हणजे रंगतच आगळी चहा चा पहिला कप पूर्ण वाळला पाहिजे.. हो हो...अर्धा कप चालेल म्हणून पुढची ऑर्डर निघालीच पाहिजे.... तळाशी राहिलेली ती पूड म्हणजे जणू... चव नसलेला चोथा असतो... तसच काहीसं विषयाला विषय निघतात पण त्याला कधी शेवट च नसतो.... काही म्हणा त्या चहा ची लज्जतच न्यारी... त्यात पण असते एक नशा भारी.. अद्रक,वेलची,सुंठ चहा चे दोस्त असतात ... बोले तो ..🤘☕ एक कटिंग एक चिअर्स एक नशा एक टपरी हसण्यावारी नेऊ नका ह.. तिथूनच एखादा..पुढे जाऊन बनेल देशाचा *प्रधानमंत्री* 🙏 मानसी गोरे चहा आवड समिती.
आजच्या विषयाला धरून एक विचार मांडते✒️ " *Work from Home *" असा इंग्लिश शब्द वापरला की खूप मोठं काही तरी केलं का?.. तर तस नाही ..काही का होईना काम चालू राहील आणि incom देखील बरोबर ना.......❓ (मत चूक किंवा बरोबर काही असू शकत) मग मला सांगा वर्षानुवर्षं घरात राहून... जी काम करते .. तिला काय पदवी? तिचा पगार कुठे? तीच स्थान काय? तर उत्तर हे की.... ती घरातच असते सो कोल्ड भाषेत बोलायचं तर.... * House wife* 🏠. वर्क फ्रॉम होम, लॉक डाऊन हे सगळे शब्द तिच्या साठी नवीन नाहीयेत .... तुम्ही कामावर गेलात की घरात ती लॉक डाऊन च असते .. आणि वर्क फ्रॉम होम सुरू होत . केला ह्याचा विचार.. बाहेर जाऊन काम करून येता... घरासाठी पैसे कमवता... पण आज ज्यावेळी हॉटेल बंद झाली... पोळी भाजी केंद्र बंद झाली... तेव्हा हीच होती... जी work from home नाही तर ... Work for home .... करत होती. मग परिस्थिती प्रमाणे... भांडी, धुणं, केर ,फरशी सगळंच * फॉर होम* साठी चालू होतं. * जिच्या वर इतके जोक करता ...* ती तर दिवसभर घरात एकटी असते किंवा तुमच्या आई बरोबर (अभिप्रेत ..सासू,ती...