.. आईला जाऊन तशी अडीच वर्ष होऊन गेली,
....१८ सप्टेंबर आईचा वाढदिवस असायचा
.... अधिक महिना सुरू होणार माहीत होतं ....म्हणून ठरवून आज च हे लिखाण.
.......ह्या आधी मागचे जे दोन अधिक मास होऊन गेले त्या अधिक मासाची ही गोष्ट.
त्यावेळी माझ्या मनात मेहुण जेवाणाचा विचार आला,
घरात बोलून दाखवला..
का करतात ते सांगितलं,
त्याच महत्व काय ते सांगितलं.. ...
अहो आणि पोरांनी संमती दिली,
एक विडा सगळ्यांनी उचला.
....घाट घातला खरा,
कमीत कमी ३३ जोडपी तरी यायला हवीत.
लेक जावई, नातेवाईक, मैत्रिणी त्यांचे अहो
असे सगळेच मिळून ३३ मेहुण तरी व्हायला पाहिजेत
हे नक्की ठरवलं होतं की पूर्ण जेवण हे आपलं महाराष्ट्रीयन असेल(दुसऱ्या कुठल्याही पदार्थाला ताटात जागा नाही, हा अन्नाचा अपमान नाही तर आपल्या खाद्य संस्कृती चा मान होता.)..
तसेच अजून एक गोष्टीचा आग्रह होता तो म्हणजे पंगत असेल, भले टेबल खुर्ची वर...
पण बुफे नाही.
आपल्याकडे येणारी जोडी ही
"लक्ष्मी-नारायण" म्हणून बोलावतोय हे मानलं जातं...(हेच अधिक मासाच महत्व)
जस जस जमेल तसे फोन करायला सुरुवात केली..
तीन,चार फोन झाल्यावर नकार घंटाच वाजायला लागली....
माहीत नाही जमेल की नाही, एकटी आले तर चालेल का,माझी अडचण आहे, हे बाहेर गावी गेलेत कामासाठी, मिटिंग आहे ...
एक नाही अशा भरपूर गोष्टी.....
थोडा मूड गेला होता..
पण.. मनासारखं मिळालं होतं..ते म्हणजे जेवण आणि पंगतीची सोय.
आई बरोबर बोले, जे होतंय ते सांगितलं...
त्यावेळची चारच वाक्य धिराची म्हणा किंवा अनुभवाची आई बोली....
"घाट घातलाय ना, घ्या देवाचं नाव आणि करा ,
जे येतील ते आपले..
अधिकाच वाण आहे ना आमंत्रण अधिकच होतील"...
मग मनाने परत उभारी घेतली....
सगळे कामाला लागलो
हळूहळू सगळ्यान कडून होकार यायला लागले....
जास्तीची आमंत्रण पण देऊन ठेवली....
साधारण 100 माणसांचा अंदाज देऊन ठेवला...
दीपदान करायचं होतं,ती खरेदी झाली...
तो दिवस उजाडला
आनंदाला आणि उत्साहाला उधाण आल होतं
नटून थटून ,स्वागताला तयार होतो..
तो घातलेला घाट...
छान पार पडला...
आणि बघता बघता ...
खरंच अधिकाच वाण अधिक च झालं...
आणि ४४ जोड्या मेहुण म्हणून लाभल्या...🙏
(एक खंत मात्र मनाला लागून राहिली...आजारपणामुळे त्यावेळी आई वडील येऊ शकले नाहीत.)...
आजच्या दिवशीच हे लिखाण
🌹 सौ.आईस अर्पण🌹
आज सुरू झालेल्या अधिकमासाच्या शुभेच्छा आणि पवित्र कामा साठी सदिच्छा
सुदंर आठवण👌
ReplyDeleteसुंदर शब्दात वर्णन केलंय आठवणींचे
ReplyDeleteKiti chaan watla hota tya divshi saglach. Athvan karun pan man aanandit hota
ReplyDeleteखूप छान लिहिले आहेस. आपला वाडा, आपला परिवार आठवला
ReplyDeleteखुप छान लिहिले आहे
ReplyDeleteKhup sunder aathvaan...
ReplyDeleteour tradition are really amazing!!
फारच छान.. आठवणी.... मनात असूनही आम्हाला लिहिता येत नाही..
ReplyDeleteUnforgettable memories
ReplyDeleteGreat,parents blessing.
ReplyDeleteUma mudda.
खरचं खूपच सुंदर लिहिले आहे.आई वडिलांचे आशीर्वाद नेहेमीच आपल्या पाठीशी असतात.
ReplyDeleteछान!मनापासून काम करायला सुरवात केली की त्याला यश येतच.तीच देवाची कृपा आणि आशीर्वादच असतो.भावना अगदी थेट पोचल्या.मस्त!
ReplyDeleteMasta
ReplyDeleteManasi Tai khup sundar aani manala bhavnare likhan aahe tumche 🙏🙏
ReplyDeleteखूपच सुंदर👌👌😊
ReplyDeleteभावस्पर्शी आठवण
ReplyDeleteManapasun keleli goshta devachya chatrakhali purna hote
ReplyDelete😍❤👍🏼
ReplyDeleteLovely 👍👍👍
ReplyDeleteLovely 👍👍👍
ReplyDeleteLovely 👍👍👍
ReplyDeleteखूप छान व्यक्त केले आहेत.
ReplyDeleteखूप छान लिहीलं आहे.
ReplyDeleteअप्रतिम, छान, सर्व मनात दाटून आले.
ReplyDeleteभावना व्यक्त करायला शब्द नाहीत.