Skip to main content

Adhik-mas...एक संस्कृती

  .. आईला जाऊन तशी अडीच वर्ष  होऊन गेली,  
 ....१८ सप्टेंबर आईचा वाढदिवस असायचा
.... अधिक महिना सुरू होणार माहीत होतं ....म्हणून ठरवून आज च हे लिखाण.

.......ह्या आधी मागचे जे दोन अधिक मास होऊन गेले त्या अधिक मासाची ही गोष्ट.
   त्यावेळी माझ्या मनात मेहुण जेवाणाचा विचार  आला, 
घरात बोलून दाखवला.. 
का करतात ते सांगितलं,
 त्याच महत्व काय ते सांगितलं.. ... 
अहो आणि पोरांनी संमती दिली, 
एक विडा सगळ्यांनी उचला.

 ....घाट घातला खरा, 
कमीत कमी ३३ जोडपी तरी यायला हवीत. 
 लेक जावई, नातेवाईक, मैत्रिणी त्यांचे अहो
असे सगळेच मिळून ३३ मेहुण तरी व्हायला पाहिजेत

      हे नक्की ठरवलं होतं की पूर्ण जेवण हे आपलं महाराष्ट्रीयन असेल(दुसऱ्या कुठल्याही पदार्थाला ताटात जागा नाही, हा अन्नाचा अपमान नाही तर आपल्या खाद्य संस्कृती चा मान होता.)..

      तसेच अजून एक गोष्टीचा आग्रह होता तो म्हणजे पंगत असेल, भले टेबल खुर्ची वर...
पण बुफे नाही.
     आपल्याकडे येणारी जोडी ही
 "लक्ष्मी-नारायण" म्हणून बोलावतोय हे मानलं जातं...(हेच अधिक मासाच महत्व)

  जस जस जमेल तसे फोन करायला सुरुवात केली..
     तीन,चार फोन झाल्यावर नकार घंटाच वाजायला लागली....
     माहीत नाही जमेल की नाही, एकटी आले तर चालेल का,माझी अडचण आहे, हे बाहेर गावी गेलेत कामासाठी, मिटिंग आहे ...
एक नाही अशा भरपूर गोष्टी.....
    थोडा मूड  गेला होता..
पण.. मनासारखं मिळालं होतं..ते म्हणजे जेवण आणि पंगतीची सोय.
     आई बरोबर बोले, जे होतंय ते सांगितलं...
त्यावेळची चारच वाक्य धिराची म्हणा किंवा अनुभवाची आई बोली....
"घाट घातलाय ना, घ्या देवाचं नाव आणि करा ,
 जे येतील ते आपले..
अधिकाच वाण आहे ना आमंत्रण अधिकच होतील"...

मग मनाने परत उभारी घेतली....
सगळे कामाला लागलो
हळूहळू सगळ्यान कडून होकार यायला लागले....
जास्तीची आमंत्रण पण देऊन ठेवली....
साधारण 100 माणसांचा अंदाज देऊन ठेवला...
दीपदान करायचं होतं,ती खरेदी झाली...
तो दिवस उजाडला
आनंदाला आणि उत्साहाला उधाण आल होतं
नटून थटून ,स्वागताला तयार होतो..

 तो  घातलेला घाट...
  छान पार पडला...
आणि बघता बघता ...
खरंच अधिकाच वाण अधिक च झालं...
 आणि ४४ जोड्या मेहुण म्हणून लाभल्या...🙏


(एक खंत मात्र मनाला लागून राहिली...आजारपणामुळे त्यावेळी आई वडील येऊ शकले नाहीत.)...

आजच्या दिवशीच हे लिखाण
   🌹 सौ.आईस अर्पण🌹

आज सुरू झालेल्या अधिकमासाच्या शुभेच्छा आणि पवित्र कामा साठी सदिच्छा
।।ओम नमो भगवते वासुदेवाय।।


   



Comments

  1. सुंदर शब्दात वर्णन केलंय आठवणींचे

    ReplyDelete
  2. Kiti chaan watla hota tya divshi saglach. Athvan karun pan man aanandit hota

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिले आहेस. आपला वाडा, आपला परिवार आठवला

    ReplyDelete
  4. खुप छान लिहिले आहे

    ReplyDelete
  5. Khup sunder aathvaan...
    our tradition are really amazing!!

    ReplyDelete
  6. फारच छान.. आठवणी.... मनात असूनही आम्हाला लिहिता येत नाही..

    ReplyDelete
  7. Great,parents blessing.
    Uma mudda.

    ReplyDelete
  8. खरचं खूपच सुंदर लिहिले आहे.आई वडिलांचे आशीर्वाद नेहेमीच आपल्या पाठीशी असतात.

    ReplyDelete
  9. छान!मनापासून काम करायला सुरवात केली की त्याला यश येतच.तीच देवाची कृपा आणि आशीर्वादच असतो.भावना अगदी थेट पोचल्या.मस्त!

    ReplyDelete
  10. Manasi Tai khup sundar aani manala bhavnare likhan aahe tumche 🙏🙏

    ReplyDelete
  11. खूपच सुंदर👌👌😊

    ReplyDelete
  12. भावस्पर्शी आठवण

    ReplyDelete
  13. Manapasun keleli goshta devachya chatrakhali purna hote

    ReplyDelete
  14. खूप छान व्यक्त केले आहेत.

    ReplyDelete
  15. खूप छान लिहीलं आहे.

    ReplyDelete
  16. अप्रतिम, छान, सर्व मनात दाटून आले.
    भावना व्यक्त करायला शब्द नाहीत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

।।देवाचिये द्वारी उभा क्षणभरी।।

मागचे बरेच दिवस आपण विठू रखुमाईच्या जणू आजूबाजूला वावरत होतो,  एकीकडे वारी होणार नाही माहीत होतं तरी  मन  भक्ती करायला कमी पडत नव्हतं....  tv वर भजन ,कीर्तनाचा आनंद घेता येत होता, कोण हरिपाठ वाचत होत,तर कोणी विष्णूसहस्त्र नाम रोज  न चुकता म्हणत होत,  कुणी आपल्या  ग्रुपवर काही धार्मिक वाचनाचा उपक्रम  हाती घेतला होता . एकादशी दुप्पट खाशी 😝...उपवासाच्या पदार्थांची रेलचेल चालू होती ,सगळीकडे वेगवेगळ्या कृती दाखवल्या जात होत्या.... त्यातून देखील कुणीतरी  विठुराया तयार केला😇 आपल्या आपल्या भक्तीने  कोणी चित्र रंगवलं, तर कोणी सुरेल आवाजात भक्ती संगीत ऐकवलं,  अभंगा वर नृत्य सादर केलं....आणि असा आपला दिवस त्या सावळ्याच्या  नामघोषात  पार पडला.... प्रत्येकानी एकच मागण मागितलं असणार  आहे हे नक्की🙏 आज उगीचच एकदम शांत वाटत.. थोडीशी उदासी येऊन जाते... समजत नाही ,पण ... एक रिकामपण  वाटत. आणि परत जेव्हा एखादा अभंग  कानावर पडतो किंवा गुणगुणला जातो ... की परत एक  *संजीवनी*  मिळाल्याचा आनंद होतो...😇 ।।...

मनःशांती..दृष्टिकोन आपला,नजर आपली.

आज गेले होते खरेदीला ला.. " मनशांती" कुठे मिळते का ते बघायला... ********************** एक दुकानदार म्हणाला, "आमच्या कडे नाही.. त्या समोरच्या दुकानात विचारा" तिथे जाऊन चौकशी केली तर.. दुकानदार  हसून  म्हणाला .. " अस  काही विचारा जे  समजेल  मला" *********************** अशी दोन चार दुकान शोधून झाली.... मनशांती कुठेच नाही मिळाली.. *********************** अचानक ....... एका दुकानाच्या बाहेर लिहली होती पाटी  फक्त नाव सांगा  पाहिजे ते मिळेल. ...... वाचून खूप आनंद झाला😊 विचारून तर बघू  आहे की नाही  हे तरी कळेल.... ******************* दोन पायरी वर गेल्यावर दुसरी पाटी दिसली 😊 हसत मुखाने आत या " लिहल होत त्यावर"   बाहेरच  ठेवा  तुमचा  "राग  आणि  तेवर "😡🤨 *********************** वाचून थोडा विचार केला बघू तरी करून..... चप्पल👡बरोबर काढून ठेवला   मनाचा एक  टोचणार त्रिकोण....🔺 ********************* दार आत ढकला  लिहल होत  पुढच्या पाटीवर...⤴️ मनाचा पण कप्पा   हलकेच उघडा  आपल्या ...

Shambhar varsha purvi....

आज  जाहली  100वर्षे  पूर्ण  अनंतात विलीन होऊन..... नांव असे स्वातंत्र्यविराचे "केशव गंगाधर टिळक" किर्तीस आला  *बाळ*  नाव घेऊन..... रत्नागिरी जिल्हा,दापोली तालुका.. चिखली गावात जन्म घेतला गंगाधर-पार्वती दाम्पत्या पोटी..... लहानपणी अन्याय सहन न करणे  आणि कुशाग्र बुद्धी... "मी शेंगा खाल्या नाहीत मी टरफल उचलणार नाही"....इथं पासून "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" ....इथं पर्यँत लहान वयात हरपले   मातेचे छाया छत्र..... वय वर्ष सोळा, विवाह बंधनात अडकले दहा वर्षाच्या तापीबाई समवेत पित्याचा आशिर्वाद मिळाला मात्र... पोहणे,व्यायाम करणे,नौका चालवणे.. संस्कृत आणि गणित विषय आवडणे.... काही दिवस शिक्षकी पेशा  पैशासाठी निवडणे... B.A. , L L B पदवी घेता जागी झाली देशभक्ती.... इंग्रज सरकार राज्य खुपू लागले वाटू लागले का असावी अशी ही सक्ती.... घेतला वसा स्वातंत्र्याचा सामान्य लोका समजावे म्हणून.....  केली उभारणी शाळा,कॉलेजची परखड पणे मते मांडली  मराठा व केसरी वृत्तपत्रातून..... समाजातील दोन्ही पिढ्या असाव्या एकत्र...