Skip to main content

"नागपंचमी"...एक सण..एक कथा

संपूर्ण चातुर्मास
नागपंचमीची कहाणी,  

ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी.

आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण कुटुंब रहात होत. त्याकुटुंबात पाच सुना होत्या.  श्रावण महिना आणि नागपंचमीचा दिवस म्हणून.. कोणी आपल्या आजोळीं, कोणी आपल्या पणजोळी, कोणी माहेरीं.. सर्व सुना गेल्या होत्या. 
सर्वांत धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीचं नव्हतं. तेव्हां ती जरा खिन्न झाली व मनांत माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून, नागोबा मला माहेराहून न्यावयास येईल, असं म्हणूं लागली.

इतक्यांत काय झालं? शेषभगवानास तिचीं करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला. त्या मुलीला नेण्याकरितां आला. ब्राह्मण विचारांत पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला? व आतांच कुठून आला? पुढें त्यानं मुलीला विचारलं. तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं, ब्राह्मणानं तिची रवानगी केलीं. त्या वेषधारी मामानं तिला आपल्या वारुळांत नेलं, खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवा बसवून आपल्या बिळांत घेऊन गेला. आपल्या बायकांमुलांना ताकीद दिली कीं, हिला कोणीं चावूं नका.

एके दिवशीं नागीण बाळंत होऊं लागली, तेव्हां हिला हातांत दिवा धरायला सांगितलं.  ती बाळंत झाली, तिचीं पिलं वळवळ करूं लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातांतला दिवा खालीं पडला. पोरांची शेपूटं भाजलीं. नागीण रागावली. तिनं सर्व हकीकत नवर्‍याला सांगितली, तो म्हणाला, “तिला लौकरच सासरीं पोंचवूं.” 
पुढं तीं पूर्ववत आनंदानं वागूं लागलीं. एके दिवशीं मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरीं पावती केली. 
नागाचीं पोरं मोठीं झालीं. आपल्या आईपाशीं चौकशी केली. आमचीं शेपूटं कशानं तुटलीं? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यास फार राग आला, त्याचा सूड घ्यावा म्हणून ते हिच्या घरीं आले.

नागपंचमीचा दिवस. हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. ते येत नाहींत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्रं काढलीं. त्यांची पूजा केली. जवळ नागांना, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांचीं पिलं पहात होतीं. सरतेशेवटीं तिनं देवाची प्रार्थना केली. “जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत.” असं म्हणुन नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार त्यांनीं पाहून मनांतील सर्व राग घालविला. मनांत तिजविषयीं दया आली. पुढं त्या दिवशीं तिथं वस्ती केली. दूध पाणी ठेवतात त्यांत पहांटेस एक नवरत्नांचा हार ठेवून आपण निघून गेले. 
तिने केलेल्या भक्तीच आणि श्रद्धेच फळ तिला मिळालं... 
आणि एक नात्याला सण मिळाला.

तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला, तसा तुम्हांआम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण!अशा प्रकारे  
श्रावण महिना आला की सण सुरू होतात.
वातावरण आपणहूनच बदलत
आई सांगायची, ते आठवतय
पूर्वी बायकांना घरातून त्या निमित्ताने बाहेर पडायला मिळायचं. 
वय लहान होती.
म्हणूनच सणांना... शास्त्र आणि भावनेची जोड दिली गेली असावी...
उदाहरणार्थ.. अस केलं की काहीतरी घडत, 
तस केलं तर ...काहीतरी वाईट होत
हा विचार आला की आपोआपच तक्रार न करता
मुलींना,बायकांना आनंदाने  माहेरी पाठवणी होत असेल.
आणि मग त्यामित्याने आनंद साजरा करता यायचा.
जसा आता आपण आपल्या मैत्रिणीनं बरोबर सहज मधे बाहेर जाऊन
मजा करू शकतो तशी पूर्वी परवानगी नव्हती

लहानपणीच्या नागपंचमीच्या गमती जमती आठवतात..
शाळेत र्निबध लिहायला सांगायचे.
शेतकऱ्याचा पण कसा मित्र आहे हे शिकवलं जायचं, म्हणून देखील त्याच्या साठी हा सण असू शकतो.

शाळेला सुट्टी मिळायची...
 हातावर मेंदी काढायची, 
फुगड्या ,झिम्मा खेळायचा
गारुड्या नाग घेऊन यायचा
दूध,लाह्या ह्याचा नेवेद्य दाखवायचा
(हे आठवत नाही आता,की तो नाग दूध पित होता की नाही🤗,पण मजा होती,भीती पण तेवढीच वाटायची हं..!)
घरी पुरणाचे उंडे असायचे.
आणि मग नागाची पूजा करून
आईने सांगितल्या प्रमाणे
प्रार्थना करायची..........🙏
"लांडोबा पुंडोबा माझ्या भावांना सुखी ठेव"


Comments

  1. Very Nice....mala he article vachun mazya lahanpani aajikade sajri honari naahpanchami aathavli....

    ReplyDelete
  2. Nice 👍
    पुन्हा एकदा आठवणींना उजाळा मिळाला ...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

।।देवाचिये द्वारी उभा क्षणभरी।।

मागचे बरेच दिवस आपण विठू रखुमाईच्या जणू आजूबाजूला वावरत होतो,  एकीकडे वारी होणार नाही माहीत होतं तरी  मन  भक्ती करायला कमी पडत नव्हतं....  tv वर भजन ,कीर्तनाचा आनंद घेता येत होता, कोण हरिपाठ वाचत होत,तर कोणी विष्णूसहस्त्र नाम रोज  न चुकता म्हणत होत,  कुणी आपल्या  ग्रुपवर काही धार्मिक वाचनाचा उपक्रम  हाती घेतला होता . एकादशी दुप्पट खाशी 😝...उपवासाच्या पदार्थांची रेलचेल चालू होती ,सगळीकडे वेगवेगळ्या कृती दाखवल्या जात होत्या.... त्यातून देखील कुणीतरी  विठुराया तयार केला😇 आपल्या आपल्या भक्तीने  कोणी चित्र रंगवलं, तर कोणी सुरेल आवाजात भक्ती संगीत ऐकवलं,  अभंगा वर नृत्य सादर केलं....आणि असा आपला दिवस त्या सावळ्याच्या  नामघोषात  पार पडला.... प्रत्येकानी एकच मागण मागितलं असणार  आहे हे नक्की🙏 आज उगीचच एकदम शांत वाटत.. थोडीशी उदासी येऊन जाते... समजत नाही ,पण ... एक रिकामपण  वाटत. आणि परत जेव्हा एखादा अभंग  कानावर पडतो किंवा गुणगुणला जातो ... की परत एक  *संजीवनी*  मिळाल्याचा आनंद होतो...😇 ।।...

मनःशांती..दृष्टिकोन आपला,नजर आपली.

आज गेले होते खरेदीला ला.. " मनशांती" कुठे मिळते का ते बघायला... ********************** एक दुकानदार म्हणाला, "आमच्या कडे नाही.. त्या समोरच्या दुकानात विचारा" तिथे जाऊन चौकशी केली तर.. दुकानदार  हसून  म्हणाला .. " अस  काही विचारा जे  समजेल  मला" *********************** अशी दोन चार दुकान शोधून झाली.... मनशांती कुठेच नाही मिळाली.. *********************** अचानक ....... एका दुकानाच्या बाहेर लिहली होती पाटी  फक्त नाव सांगा  पाहिजे ते मिळेल. ...... वाचून खूप आनंद झाला😊 विचारून तर बघू  आहे की नाही  हे तरी कळेल.... ******************* दोन पायरी वर गेल्यावर दुसरी पाटी दिसली 😊 हसत मुखाने आत या " लिहल होत त्यावर"   बाहेरच  ठेवा  तुमचा  "राग  आणि  तेवर "😡🤨 *********************** वाचून थोडा विचार केला बघू तरी करून..... चप्पल👡बरोबर काढून ठेवला   मनाचा एक  टोचणार त्रिकोण....🔺 ********************* दार आत ढकला  लिहल होत  पुढच्या पाटीवर...⤴️ मनाचा पण कप्पा   हलकेच उघडा  आपल्या ...

Shambhar varsha purvi....

आज  जाहली  100वर्षे  पूर्ण  अनंतात विलीन होऊन..... नांव असे स्वातंत्र्यविराचे "केशव गंगाधर टिळक" किर्तीस आला  *बाळ*  नाव घेऊन..... रत्नागिरी जिल्हा,दापोली तालुका.. चिखली गावात जन्म घेतला गंगाधर-पार्वती दाम्पत्या पोटी..... लहानपणी अन्याय सहन न करणे  आणि कुशाग्र बुद्धी... "मी शेंगा खाल्या नाहीत मी टरफल उचलणार नाही"....इथं पासून "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" ....इथं पर्यँत लहान वयात हरपले   मातेचे छाया छत्र..... वय वर्ष सोळा, विवाह बंधनात अडकले दहा वर्षाच्या तापीबाई समवेत पित्याचा आशिर्वाद मिळाला मात्र... पोहणे,व्यायाम करणे,नौका चालवणे.. संस्कृत आणि गणित विषय आवडणे.... काही दिवस शिक्षकी पेशा  पैशासाठी निवडणे... B.A. , L L B पदवी घेता जागी झाली देशभक्ती.... इंग्रज सरकार राज्य खुपू लागले वाटू लागले का असावी अशी ही सक्ती.... घेतला वसा स्वातंत्र्याचा सामान्य लोका समजावे म्हणून.....  केली उभारणी शाळा,कॉलेजची परखड पणे मते मांडली  मराठा व केसरी वृत्तपत्रातून..... समाजातील दोन्ही पिढ्या असाव्या एकत्र...