आणि लॉक डाऊन सुरू झालं...
एक एक दिवस सरकू लागला...
भिती आणि काळजीने घर घर वाढू लागली..
काही म्हणून सुचेना...
सगळ्या गोष्टी बंद बंद बंद....
दुसरा उपायच राहिला नाही...
बंद मधे देवळातील देव देखील सामील झाले...
देऊळ ओस पडली..
एक नाही अनेक तोंड बोलू लागली...
😢😢
आणि मग एक कल्पना, एक विचार ....
मनातील कवीला वाटून गेला..
लेखणीने विचार मांडले गेले...
अस वाटलं जशी आपली बाजू
तशीच देवांची पण बाजू असू शकते..
म्हणून...........
"देवांनी पण रजेचा अर्ज टाकला "
"माणूस मात्र त्यावर सही करायला विसरला"
"त्यांच्या रजेला मंजुरी काही मिळत नव्हती"
"कारण आपली गाऱ्हाणी च कुठं सपंतच होती"
"देवांच पण गणगोत,मित्र परिवार असेल"
"संदेश आणि व्हिडिओ कॉल फक्त डोळे बंद करून होत असेल"
"एकमेकांना वेळ आणि स्पेस द्यावीशी वाटत असेल"
"भटकायला कुठे तरी जायचं असेल"
"रखुमाईला आपल्या माहेरची ओढ लागली असेल"
"गणरायाला दरवर्षी पृथ्वीवर येऊन बोर झालं असेल"...
"शिव पार्वतीच्या मागे लागून शांत ठिकाणी जायचं असेल"
"देवींनी लेडीज स्पेशल टूर च प्लनिंग केलं असेल"
"आपली तिच तिच दुःख ऐकून कंटाळा आला असेल"
"किती आणि काय काय, देवाचं पण आयुष्य असेल"
"बहुतेक हा विचार आपण कधी केलाच नसेल"
"म्हणूनच ...सगळं देवगण संपावर गेलं असेल"
"तरी देखील..एक मात्र नक्की"
"तरी देखील...एक मात्र नक्की"
"तो जिथे कुठे असेल...त्याला आपली चिंता नक्कीच सतावत असेल"
खूप छान कल्पना
ReplyDeleteछान लिहिलं आहे.. लिहित रहा.
ReplyDelete