मागच्या आठवड्यात "प्राइम व्हिडीओ app" डाऊनलोड करून घेतला शकुंतलादेवी पिच्चर बघण्यासाठी ...लॉक डाऊन मधे हे नवीन add झालं बरका
अशीच app वर नजर फिरताना...
"Bandish Bandits"
ह्या वेबसिरीज वर गेली (अरे बापरे मलाच खूप मोठे शब्द वापरतोय अस वाटतंय.. Web series and all... हा हा हा)
रिलीज होऊन 10,12 दिवस झाले आहेत.मी रविवारी दिवसभरात त्याचा फडशा पाडला....... पुढे काय हे तर वाटतच होत.
छान काहीतरी रमणीय डोळ्याला बघायला आणि मुख्य म्हणजे तितकंच श्रवणीय देखील.
राजस्थान च लोकेशन, देऊळ,वाळवंट,हवेली... आहा.. सुंदरच👌👌
सगळ्यांचे घेतलेले पेहनाव,ज्वेलरी..क्या बात
आताची पिढी आणि मागची पिढी ह्याच फ्युजन दाखवलं आहे.... कुठे ही संस्कार, रीतिरिवाज, घराणेशाही ला धक्का न लावता सिरीज पुढे पुढे जाते.
आणि हो मुख्य म्हणजे... अशा पिच्चर म्हणा किंवा आताच्या वेब सिरीज मधे आपला कोणी मराठी चेहरा असेल तर मला भारी वाटत ह.....काही म्हणा.
आपला मराठी बाणा जागा असतोचच तो अजून भाव खाऊन जातो....अतुल कुलकर्णी हे नाव..
नसुरुद्दीन शहा च्या समोर तेव्हड्याच ताकदीने उभे राहिले आहेत acting मधे.... रुबाबदार,शांत,गंभीर पण आतून चिडलेला एक मुलगा ...एक मिश्किल हास्य आणि मनात टोचत असलेली एक सल.
प्रत्येक कलाकार बघताना अस वाटत किती परफेक्ट निवड आणि त्यांचं अस्तित्व.. एक नात आणि एक गोष्ट अशी उलगडत जाते...ग्रेट.
गाणी कुणी म्हटली आहेत खरंच माहीत नाही. शास्त्रीय संगीत, घराणं ह्याचा अभ्यासकरून सगळं जमवलं आहे....
एक आवाज ओळखला तो म्हणजे शंकर महादेवन ह्यांचा....त्यामुळे काही गाण्याच्या चाली ऐकताना आपल्या कट्यार काळजात घुसली ची आठवण येत होती.....
अशा प्रकारे पहिल्या एपिसोड पासून शेवट पर्यंत ...रमणीय आणि श्रवणींय नक्कीच आहे.
बर आता हे लिहायचं कारण अस की .....
थोड्या वेळा पूर्वी पंडित जसराज ह्यांच निधन झाल्याची बातमी आली आणि डोळे पाण्याने भरले.... फक्त आठवलं ते म्हणजे #"ओम नमो भागवते वासुदेवाय"# हे गाणं .
जे मी रोज ऐकते ....
तो आवाज आपल्याला देवाच्या गाभाऱ्यात नेऊन ठेवतो...हे नक्की.🙏
तेवढी त्याची ताकद नक्कीच आहे....
आणि
आपली पुण्याई.
त्यांच्या विषयी थोडं वाचावं म्हणून गुगल सर्च मारत होते आणि चार दिवसा पूर्वीच त्यांनी वरती मी ज्या वेबसिरीज चा उल्लेख केला आहे त्या संगीतकाराला व्हिडीओ कॉल द्वारे शुभेच्छा दिलेला व्हिडीओ बघायला मिळाला.... थोडक्यात पण मन भरून बोले आहेत,तोंड भरून कौतुक केलं आहे.
ही देखील किती मोठी गोष्ट आहे ...
"त्रिवार वंदन".
🙏🙏🙏🙏🙏....
म्हणून अस वाटून गेलं..
एक योग आणि एक वियोग
साधला गेला.
R I P Pandit Jasraj🙏🙏
ReplyDeleteI am motivated to watch Bandish Bandits
ReplyDeleteHo na kuph aahe Bandish Bandits हुबेहुब तू छान वर्णन केले आहे
ReplyDeleteनक्की बघा
ReplyDeleteKhup chan lekh .. mi baghitali aahe Ti Webseries ...
ReplyDeletePandit Jasraj ji na Pranam 🙏
Music is Life .. That’s why Our Heart have beats !!🎼🎧
वा....👌👍
DeleteWell written ...
ReplyDeleteछान!
ReplyDeleteSeries baddal माझ्या मुलीकडून ऐकले आहे. पण तुम्ही केलेले वर्णन वाचून नक्कीच बघेन. नो लाईफ without serene music.
Series फार छान आहे.... संगीत अतिशय अप्रतिम.
ReplyDeleteनवीन पिढीला छान धडा आहे.. त्या हिरो चे डेडिकेशन.. कष्टाची तयारी... होम वर्क.
फारच छान.
आपल्याला सुद्धा शिकण्यासारखे आहे