Skip to main content

एक Bandish...अनंतात विलीन

मागच्या आठवड्यात "प्राइम व्हिडीओ app" डाऊनलोड करून घेतला  शकुंतलादेवी पिच्चर बघण्यासाठी ...लॉक डाऊन मधे हे नवीन add झालं बरका 
    अशीच app वर नजर फिरताना...
"Bandish Bandits"

ह्या वेबसिरीज वर गेली (अरे बापरे मलाच खूप मोठे शब्द वापरतोय अस वाटतंय.. Web series and all... हा हा हा)
रिलीज होऊन 10,12 दिवस झाले आहेत.मी रविवारी  दिवसभरात  त्याचा फडशा पाडला....... पुढे काय हे तर वाटतच होत.
 छान काहीतरी रमणीय डोळ्याला बघायला आणि  मुख्य म्हणजे तितकंच श्रवणीय देखील.

राजस्थान च लोकेशन, देऊळ,वाळवंट,हवेली... आहा.. सुंदरच👌👌
सगळ्यांचे घेतलेले पेहनाव,ज्वेलरी..क्या बात

    आताची पिढी आणि मागची पिढी ह्याच फ्युजन दाखवलं आहे.... कुठे ही संस्कार, रीतिरिवाज, घराणेशाही ला धक्का न लावता सिरीज पुढे पुढे जाते.
    आणि हो मुख्य म्हणजे... अशा पिच्चर म्हणा किंवा आताच्या वेब सिरीज  मधे  आपला कोणी मराठी चेहरा असेल तर मला भारी वाटत ह.....काही म्हणा.
आपला मराठी बाणा जागा असतोचच तो अजून भाव खाऊन जातो....अतुल कुलकर्णी हे नाव..

नसुरुद्दीन शहा च्या समोर तेव्हड्याच ताकदीने उभे राहिले आहेत acting मधे.... रुबाबदार,शांत,गंभीर पण आतून चिडलेला एक मुलगा ...एक मिश्किल हास्य आणि मनात टोचत असलेली एक सल.

प्रत्येक कलाकार बघताना अस वाटत किती परफेक्ट निवड आणि त्यांचं अस्तित्व.. एक नात आणि एक गोष्ट अशी उलगडत जाते...ग्रेट.

गाणी कुणी म्हटली आहेत खरंच माहीत नाही. शास्त्रीय  संगीत, घराणं ह्याचा अभ्यासकरून सगळं जमवलं आहे....
    एक आवाज ओळखला तो म्हणजे शंकर महादेवन  ह्यांचा....त्यामुळे काही गाण्याच्या चाली ऐकताना आपल्या कट्यार काळजात घुसली ची आठवण येत होती.....
     अशा प्रकारे पहिल्या एपिसोड पासून शेवट पर्यंत ...रमणीय आणि श्रवणींय नक्कीच आहे.
     बर आता हे लिहायचं कारण अस की .....
     थोड्या वेळा पूर्वी  पंडित जसराज ह्यांच निधन झाल्याची बातमी आली आणि डोळे पाण्याने भरले.... फक्त आठवलं ते म्हणजे  #"ओम नमो भागवते वासुदेवाय"#  हे गाणं .
जे मी रोज ऐकते ....
     तो आवाज आपल्याला  देवाच्या गाभाऱ्यात नेऊन ठेवतो...हे नक्की.🙏
तेवढी त्याची ताकद नक्कीच आहे....
आणि 
आपली पुण्याई.
        त्यांच्या विषयी थोडं वाचावं म्हणून गुगल सर्च मारत होते आणि चार दिवसा पूर्वीच त्यांनी वरती मी ज्या वेबसिरीज चा उल्लेख केला आहे त्या संगीतकाराला व्हिडीओ कॉल द्वारे शुभेच्छा दिलेला व्हिडीओ बघायला मिळाला.... थोडक्यात पण मन भरून बोले आहेत,तोंड भरून कौतुक केलं आहे.
ही देखील किती मोठी गोष्ट आहे ...
 "त्रिवार वंदन".
🙏🙏🙏🙏🙏....
म्हणून अस वाटून गेलं..
एक योग आणि एक वियोग
साधला गेला.

Comments

  1. I am motivated to watch Bandish Bandits

    ReplyDelete
  2. Ho na kuph aahe Bandish Bandits हुबेहुब तू छान वर्णन केले आहे

    ReplyDelete
  3. Khup chan lekh .. mi baghitali aahe Ti Webseries ...
    Pandit Jasraj ji na Pranam 🙏

    Music is Life .. That’s why Our Heart have beats !!🎼🎧

    ReplyDelete
  4. छान!
    Series baddal माझ्या मुलीकडून ऐकले आहे. पण तुम्ही केलेले वर्णन वाचून नक्कीच बघेन. नो लाईफ without serene music.

    ReplyDelete
  5. Series फार छान आहे.... संगीत अतिशय अप्रतिम.
    नवीन पिढीला छान धडा आहे.. त्या हिरो चे डेडिकेशन.. कष्टाची तयारी... होम वर्क.
    फारच छान.
    आपल्याला सुद्धा शिकण्यासारखे आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

।।देवाचिये द्वारी उभा क्षणभरी।।

मागचे बरेच दिवस आपण विठू रखुमाईच्या जणू आजूबाजूला वावरत होतो,  एकीकडे वारी होणार नाही माहीत होतं तरी  मन  भक्ती करायला कमी पडत नव्हतं....  tv वर भजन ,कीर्तनाचा आनंद घेता येत होता, कोण हरिपाठ वाचत होत,तर कोणी विष्णूसहस्त्र नाम रोज  न चुकता म्हणत होत,  कुणी आपल्या  ग्रुपवर काही धार्मिक वाचनाचा उपक्रम  हाती घेतला होता . एकादशी दुप्पट खाशी 😝...उपवासाच्या पदार्थांची रेलचेल चालू होती ,सगळीकडे वेगवेगळ्या कृती दाखवल्या जात होत्या.... त्यातून देखील कुणीतरी  विठुराया तयार केला😇 आपल्या आपल्या भक्तीने  कोणी चित्र रंगवलं, तर कोणी सुरेल आवाजात भक्ती संगीत ऐकवलं,  अभंगा वर नृत्य सादर केलं....आणि असा आपला दिवस त्या सावळ्याच्या  नामघोषात  पार पडला.... प्रत्येकानी एकच मागण मागितलं असणार  आहे हे नक्की🙏 आज उगीचच एकदम शांत वाटत.. थोडीशी उदासी येऊन जाते... समजत नाही ,पण ... एक रिकामपण  वाटत. आणि परत जेव्हा एखादा अभंग  कानावर पडतो किंवा गुणगुणला जातो ... की परत एक  *संजीवनी*  मिळाल्याचा आनंद होतो...😇 ।।...

मनःशांती..दृष्टिकोन आपला,नजर आपली.

आज गेले होते खरेदीला ला.. " मनशांती" कुठे मिळते का ते बघायला... ********************** एक दुकानदार म्हणाला, "आमच्या कडे नाही.. त्या समोरच्या दुकानात विचारा" तिथे जाऊन चौकशी केली तर.. दुकानदार  हसून  म्हणाला .. " अस  काही विचारा जे  समजेल  मला" *********************** अशी दोन चार दुकान शोधून झाली.... मनशांती कुठेच नाही मिळाली.. *********************** अचानक ....... एका दुकानाच्या बाहेर लिहली होती पाटी  फक्त नाव सांगा  पाहिजे ते मिळेल. ...... वाचून खूप आनंद झाला😊 विचारून तर बघू  आहे की नाही  हे तरी कळेल.... ******************* दोन पायरी वर गेल्यावर दुसरी पाटी दिसली 😊 हसत मुखाने आत या " लिहल होत त्यावर"   बाहेरच  ठेवा  तुमचा  "राग  आणि  तेवर "😡🤨 *********************** वाचून थोडा विचार केला बघू तरी करून..... चप्पल👡बरोबर काढून ठेवला   मनाचा एक  टोचणार त्रिकोण....🔺 ********************* दार आत ढकला  लिहल होत  पुढच्या पाटीवर...⤴️ मनाचा पण कप्पा   हलकेच उघडा  आपल्या ...

Shambhar varsha purvi....

आज  जाहली  100वर्षे  पूर्ण  अनंतात विलीन होऊन..... नांव असे स्वातंत्र्यविराचे "केशव गंगाधर टिळक" किर्तीस आला  *बाळ*  नाव घेऊन..... रत्नागिरी जिल्हा,दापोली तालुका.. चिखली गावात जन्म घेतला गंगाधर-पार्वती दाम्पत्या पोटी..... लहानपणी अन्याय सहन न करणे  आणि कुशाग्र बुद्धी... "मी शेंगा खाल्या नाहीत मी टरफल उचलणार नाही"....इथं पासून "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" ....इथं पर्यँत लहान वयात हरपले   मातेचे छाया छत्र..... वय वर्ष सोळा, विवाह बंधनात अडकले दहा वर्षाच्या तापीबाई समवेत पित्याचा आशिर्वाद मिळाला मात्र... पोहणे,व्यायाम करणे,नौका चालवणे.. संस्कृत आणि गणित विषय आवडणे.... काही दिवस शिक्षकी पेशा  पैशासाठी निवडणे... B.A. , L L B पदवी घेता जागी झाली देशभक्ती.... इंग्रज सरकार राज्य खुपू लागले वाटू लागले का असावी अशी ही सक्ती.... घेतला वसा स्वातंत्र्याचा सामान्य लोका समजावे म्हणून.....  केली उभारणी शाळा,कॉलेजची परखड पणे मते मांडली  मराठा व केसरी वृत्तपत्रातून..... समाजातील दोन्ही पिढ्या असाव्या एकत्र...