एक राज्य होत.....
राजा राणी आपल्या प्रजेची खूप काळजी घेत होते.
प्रेमाने आणि जबाबदारीने .
त्यामुळे प्रजा एकदम सुखी होती.
त्या राज्यातील प्रजेनीच ते झाड लावलं होत.
फक्त त्याला नियम असा होता की,
प्रत्येक घरातील कुणीतरी
विहिरीवरून पाणी काढून आणायचं
आणि झाडाला घालायचं.
आनंदाने सगळे जण करत होत आणि
झाड आनंदाचे झाड म्हणून
फुलत होत,वाढत होत....☺️
त्याच एक वैशिष्ठ ,अस की...
फळ आणि फुल पण एकदमच बहरत होत.
फुलांचा गधं वेगळाच होता....🌺
फळाला एक वेगळीच गोडी होती...🍑
बघता बघता...त्या रोपट्याच रूपांतर एका भल्या मोठ्या वृक्षांत झालं.🌳🌺🍑
झाडाला विहरीवरून पाणी आणून घालण्याची प्रथा वर्षानुवर्षे चालू होती.
थोड्या दिवसांनी
प्रजेला एकदा जाणवलं..
फुलांचा सडा पडायचा....पण
एक फुल उचल आणि त्याचा वास घेतला की त्या व्यक्तीची एक छान आठवण विसरली जात होती.🤔🤔
एक फळ खाल्लं की......
सुखाचा एक क्षण कमी होत होता...😔😔
राजा राणीच्या महालात ही बातमी गेली.
दोघांना ही हे खरं वाटत नव्हतं...
म्हणून ते त्या झाडा पाशी पोचले.
राणीने फुल उचल.....🌺
राजानी फळ चविने खाल्लं.....🍑
काही क्षणात राणी आपली चांगली आठवण विसरायला लागली..
अन राजाला...सुखाचा एक क्षण
आपल्या पासून लांब जातोय अस जाणवू लागल....
राजा राणी ला प्रजेच बोलणं
पटायला लागलं
काय करावं हे सुचेना ...मग
दवंडी पिटवण्यात आली.....🗣️
जो कोणी हे शोधेल,
त्याला बक्षीस देण्यात येईल🏅
गावात ज्या ठिकाणी विहीर होती ,तिथेच एक साधू रहात होते.
ते म्हणाला मी देतो त्याच उत्तर... आणि
त्यांनी प्रजेला उद्देशून बोलायला सुरुवात केली..
"ज्या वेळी सगळ्यांनी मिळून हे रोपटं लावलं होत, ते खूप आनंदाने आणि निस्वार्थी मनाने🤗
जस...जस झाड मोठं व्हायला लागल..
त्याला फुल फळ यायला लागली....
तुमची मानसिकता बदली.....
तुम्ही पाणी घालताना मी पणाचा भाव ठेवून पाणी घालायला लागलात...
ते मी पण त्या पाण्यात उतरल....
आणि
झाडाच मूळ च बदलून गेलं....त्याचा मूळ स्वभाव तुम्ही बदलात*......
मी विहिरीवरून पाणी आणतो,
मीच योग्य वेळी पाणी घातलं....
कमी,जास्त...
अशा अनेक गोष्टी घडायला लागल्या😢
खरतर जे दान तुम्हाला निसर्गाने दिल आहे...
ऊन,वारा,पाऊस,पाणी....
किती तरी अगणित गोष्टी....
ज्या निसर्गाने तुम्हाला भरभरून दिल्या आहेत
त्याचाच तुम्ही गर्व करायला लागलात...😡
तिथेच सगळं चक्र फिरल.
🧓👴👨🦳👩🦳👨🦰👩🦰👱👨🦱👩🦱...😔
परत ही चूक होणार नाही ह्याच आश्वासन साधू ला देऊन त्या वृक्षाची माफी सर्वांनी मागितली....
अशा प्रकारे ते झाड परत एकदा आनंदाचे झाड म्हणून ,सगळी कडे त्याची ख्याती पसरली
ही साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण.
🌳निसर्गाने जे दिलंय त्यासाठी आभार🌳
एक आनंदाचे झाड आपल्या प्रत्येकाच्या
खूप छान
ReplyDeleteKuph sunder ...
ReplyDeleteKhupch chan nakkich asse ek zad lavle pahije
ReplyDeleteYess . Sure !!
ReplyDeleteLove respect and care mother nature 🙏
Mast
ReplyDeleteMast
ReplyDeleteअप्रतिम !!!
ReplyDeleteचला , झाडे लावू या !!!
मनापासून निसर्गावर प्रेम करू या !!
🌳🌲🌴🌳
खूप भावस्पर्शी... खूप मोठी गोष्ट... हेतू स्पष्ट असावा आणि निरंतर असावा
ReplyDeleteछान ,,, वास्तव आहे माणूस कोणतीही गोष्ट करताना अपेक्षा, मी पणा ठेवतो.
ReplyDeleteMASTCHHHH
ReplyDeleteKhup chhan tai. Apratim.☝️👌
ReplyDeleteVery Nice👌👍
ReplyDeleteखूप सुंदर लेख वाचला
ReplyDeleteMastach
ReplyDeleteBeautiful thought Manisha Tai...👌👏👏👏👏
ReplyDelete