Skip to main content

आहे त्यात सुखी राहू...

।।आयुष्य किती छान होत।।😇

 ।।येण जाण किती सोप होत।।🏃

।।काहीच नियमांच पालन नव्हत।।🚦

।।की मनात कशाचं भय नव्हत।।.....🐲

।।मनात आलं की भेटून गप्पा गोष्टी करत होतो।।☕

।।पिच्चर,हॉटेलिंग आणि शॉपिंग एकाच दिवशी आटपत होतो।।🧥🥼👠👜🕶️

।।लॉंग ड्राईव्ह ची मजा घेत  होतो।।🚙

।।सहज मधे भाजी ला उतरल की पाणी पुरी खात होतो।।🥦🥕...🍴

।।आपल्या काम वाली बाई ला..येणार नशील तर आधीच सांग अस सांगत होतो।।👩‍🦰

।।कधी तरी धुणं, भांडी,केर आणि फरशी आनंदाने करत होतो।।🧹🧽🧴

।।महिन्याच्या घर खर्चातून थोडे थोडे पैसे वाचवत होतो।।😛

।।भिशी आणि मैत्रिणी मिळून  गप्पांची  मैफिल रंगवत होतो।।😄😄

।।खर तर साधं पण छान आयुष्य जगत होतो।।..😇

..आता काय🤭🤔
...आता अस वाटतंय..एकमेकांना भेटायला तरसलो आहोत...कधी एकदा गाठ पडतीये खरतर अस झालं आहे....ह्या पुढे मला वेळ नाही असं म्हणू नका...आणि नसेल ते कारण देऊन उगाच च एकमेकांना टाळू नका..

ह्या कोरोना नी काय शिकवलं ते कधीच विसरू नका....👹
जातपात त्याने ठेवलेच नाही..
गरीब श्रीमंत भेदभाव केलाच नाही...
हाल काय असतात हे पण दाखवून दिलं...😓
आणि तुमच्या कडे काय सुख आहे हे पण त्यानी जाणवून दिल.😍

देवा तुझे देखील आभार...
आहे त्याच्यात सुखी राहू ...
जास्त नको .
मात्र...
आहे ते कमी पडू देऊ नको.
🙏🙏

Comments

  1. Very true... I am missing those days when i could go out freely anywhere.... There was no fear, no restrictions....Life was so easy.
    We take everything for granted. But this pandemic has taught us that we should value and be grateful for what we have. Happiness lies in small things....May God give us strength to face the current situation & lets hope that life will return to normalcy very soon🙏🙏

    ReplyDelete
  2. Very nice and very true, Covid taught us how to live life, and value of each and every thing, includes, Relation, money, shopping ( unnecessary) etc

    ReplyDelete
  3. गायनात काही जागा अचूक पकडल्या की गाणे श्रवणीय होते तोच नियम लिखाणात आहे. वाचणा-याला आपण वाचतोय तै स्वतःशी रिलेट करतो, असे जाणवले म्हणजे चांगले लिखाण... Good going

    ReplyDelete
  4. Ho g Mansi khoop miss karate mi sagalyana apalya gappa, picnic ha carona kadhi janar kay mahit ata vat pahane ani bhetane

    ReplyDelete
  5. True !! Human being is a social animal created by God.Being Isolated being alone being independent are temporary and fractional concepts . Better be together .Be united .Be grateful to mother nature .

    ReplyDelete
  6. Manasi asa watatay march nanter direct December yeto ka kay . Apala ayush rahilach nahi. Jiv muthit dharun jagatoy.

    ReplyDelete
  7. अगदी खरे आहे. अपल्या सगळ्यांना एक मेकांच्या महत्वाची जाणीव करून दिली आहे. प्रत्येक माणसाची, वस्तूंची, नात्याची खरी किंमत आपल्याला करोनात कळली आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

।।देवाचिये द्वारी उभा क्षणभरी।।

मागचे बरेच दिवस आपण विठू रखुमाईच्या जणू आजूबाजूला वावरत होतो,  एकीकडे वारी होणार नाही माहीत होतं तरी  मन  भक्ती करायला कमी पडत नव्हतं....  tv वर भजन ,कीर्तनाचा आनंद घेता येत होता, कोण हरिपाठ वाचत होत,तर कोणी विष्णूसहस्त्र नाम रोज  न चुकता म्हणत होत,  कुणी आपल्या  ग्रुपवर काही धार्मिक वाचनाचा उपक्रम  हाती घेतला होता . एकादशी दुप्पट खाशी 😝...उपवासाच्या पदार्थांची रेलचेल चालू होती ,सगळीकडे वेगवेगळ्या कृती दाखवल्या जात होत्या.... त्यातून देखील कुणीतरी  विठुराया तयार केला😇 आपल्या आपल्या भक्तीने  कोणी चित्र रंगवलं, तर कोणी सुरेल आवाजात भक्ती संगीत ऐकवलं,  अभंगा वर नृत्य सादर केलं....आणि असा आपला दिवस त्या सावळ्याच्या  नामघोषात  पार पडला.... प्रत्येकानी एकच मागण मागितलं असणार  आहे हे नक्की🙏 आज उगीचच एकदम शांत वाटत.. थोडीशी उदासी येऊन जाते... समजत नाही ,पण ... एक रिकामपण  वाटत. आणि परत जेव्हा एखादा अभंग  कानावर पडतो किंवा गुणगुणला जातो ... की परत एक  *संजीवनी*  मिळाल्याचा आनंद होतो...😇 ।।...

मनःशांती..दृष्टिकोन आपला,नजर आपली.

आज गेले होते खरेदीला ला.. " मनशांती" कुठे मिळते का ते बघायला... ********************** एक दुकानदार म्हणाला, "आमच्या कडे नाही.. त्या समोरच्या दुकानात विचारा" तिथे जाऊन चौकशी केली तर.. दुकानदार  हसून  म्हणाला .. " अस  काही विचारा जे  समजेल  मला" *********************** अशी दोन चार दुकान शोधून झाली.... मनशांती कुठेच नाही मिळाली.. *********************** अचानक ....... एका दुकानाच्या बाहेर लिहली होती पाटी  फक्त नाव सांगा  पाहिजे ते मिळेल. ...... वाचून खूप आनंद झाला😊 विचारून तर बघू  आहे की नाही  हे तरी कळेल.... ******************* दोन पायरी वर गेल्यावर दुसरी पाटी दिसली 😊 हसत मुखाने आत या " लिहल होत त्यावर"   बाहेरच  ठेवा  तुमचा  "राग  आणि  तेवर "😡🤨 *********************** वाचून थोडा विचार केला बघू तरी करून..... चप्पल👡बरोबर काढून ठेवला   मनाचा एक  टोचणार त्रिकोण....🔺 ********************* दार आत ढकला  लिहल होत  पुढच्या पाटीवर...⤴️ मनाचा पण कप्पा   हलकेच उघडा  आपल्या ...

Shambhar varsha purvi....

आज  जाहली  100वर्षे  पूर्ण  अनंतात विलीन होऊन..... नांव असे स्वातंत्र्यविराचे "केशव गंगाधर टिळक" किर्तीस आला  *बाळ*  नाव घेऊन..... रत्नागिरी जिल्हा,दापोली तालुका.. चिखली गावात जन्म घेतला गंगाधर-पार्वती दाम्पत्या पोटी..... लहानपणी अन्याय सहन न करणे  आणि कुशाग्र बुद्धी... "मी शेंगा खाल्या नाहीत मी टरफल उचलणार नाही"....इथं पासून "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" ....इथं पर्यँत लहान वयात हरपले   मातेचे छाया छत्र..... वय वर्ष सोळा, विवाह बंधनात अडकले दहा वर्षाच्या तापीबाई समवेत पित्याचा आशिर्वाद मिळाला मात्र... पोहणे,व्यायाम करणे,नौका चालवणे.. संस्कृत आणि गणित विषय आवडणे.... काही दिवस शिक्षकी पेशा  पैशासाठी निवडणे... B.A. , L L B पदवी घेता जागी झाली देशभक्ती.... इंग्रज सरकार राज्य खुपू लागले वाटू लागले का असावी अशी ही सक्ती.... घेतला वसा स्वातंत्र्याचा सामान्य लोका समजावे म्हणून.....  केली उभारणी शाळा,कॉलेजची परखड पणे मते मांडली  मराठा व केसरी वृत्तपत्रातून..... समाजातील दोन्ही पिढ्या असाव्या एकत्र...