Skip to main content

बैलपोळा-जबाबदारी एका मुक्या प्राण्याची.


🏘️आमच्या गावी एका शेतकऱ्याच्या घरात  घडलेली गोष्ट तुम्हाला सांगते.

शेतकरी म्हटला की घरात कोंबड्या, गाईगुर असणारच.   राखणीला एखाद कुत्र पण असत.  
मालक,घरातील माणस आणि हे प्राणी..  त्यांना एकमेकांची खूप सवय लागलेली असते.  एक प्रेम ,जिव्हाळा तयार झालेला असतो...
(आपल्या शहरी भाषेत सांगायचं झालं तर *जबरदस्त  "Bonding"*...)

तर एकदा काय झालं...........
गुरांना चारा आण्यासाठी डोंगरावर जायला लागायचं.   मालकाने बैलांना  गाडीला जुंपल.  त्यातल्या एका बैलाच नाव होतं "चतुर"😊.
 अस ऐकून आहे की खरंच तो अतिशय हुशार आणि प्रेमळ होता.घरातील कोणी पाया जवळ जरी बसल तरी काही करत नसे.

....जाताना गाडी मोकळी होती,त्यामुळे कदाचित ती पळायला हलकी असेल.  गाडी डोंगरावर पोचली.  मालकाने पूर्ण गवत तोडून चारा गोळा केला.  हळूहळू चाऱ्याने गाडी भरली,पेंढ्या तयार झाल्या....

तो पर्यंत हळूहळू अंधार पडायला लागला होता.  डोंगरावर एकच गाडी एका वेळेला जाईल अशी पायवाट होती. एकबाजूला तस दरी सारखाच की .

गाडी घराकडे यायला निघाली, पुढे थोडं अंतर गेल्यावर गाडीतल्या पेंढ्यानी कदाचित गाडी जड झाली असल्यामुळे अंदाज चुकला आणि गाडी उलटली,दोन्ही बैल घसरले मालक वरून खाली पडले ते "चतुर" बैलाच्या पायात...

पुढचा अनुभव तीच व्यक्ती सांगू शकते जिने हे अनुभवलं ते म्हणजे त्या मालकाने...  एका जरी बैलाने लाथ मारली असती ,पाय हलवले असते तर सगळं सगळं  संपल असत..

जणू त्या बैला ला पूर्ण कल्पना आली होती...त्यानी पूर्ण पाय जमिनीत रोउन ठेवले,  त्याने दुसऱ्या बैलाला देखील हालू दिल नाही..

 काय घडलंय हे समजायला काही वेळ गेला.  ...मालकाने हळूहळू उठण्याचा प्रयत्न केला तो त्याबैलाच्या पायाच्या आधारानेच...
 हळूहळू स्वतःला  आणि बैलांना सही सलामत बाहेर काढल.. 
कसे पांग फेडू रे अस म्हणून मालकाने घट्ट मिठी मारली आणि आपल्या अश्रूंना वाट करून दिली.....आणि गाडी घराकडे निघाली.

*एका मुक्या प्राण्याने आपली जबाबदारी आणि इमान पणाला लावून*  मालकाला सुखरूप घरी आणलं😊😊

अशा अनेक घटना घडत असतील,अनुभव येत असेल.   म्हणूनच त्या  प्राण्याचे जे ऋण आहे ते फेडायलाच बैलपोळा साजरा केला जात असेल कदाचित.

आदल्या दिवशी  *खांद मळणी* करतात
हळद आणि तेल एकत्र करून  बैलांना पूर्ण अंगाला लावून ,चोळून  कदाचित क्षीण बाहेर काढतात.  त्या मागची भावना पण ही असते की वर्षभर  तो जे आपल्या साठी करतो म्हणून त्त्याची सेवा आपण करायची.
रात्री त्याला बाजरीच्या घुगऱ्या करून जेवू घालतात,एक पौष्टिक अन्न म्हणून.

दुसऱ्या दिवशी बैलांना आंघोळ घातली जाते.  शिंगांना रंग लावतात, अंगावर पण काही डिजाईन किंवा पूर्ण रंगवलं जात, काही वेळेला म्हणे आदल्या दिवशी मेंदीने पण रंगवलं जात, ते खूप छान दिसत दुसऱ्या दिवशी.
डोळ्यात काजळ,गळ्यात घुंघराचे चाळ, शिंगावर बाशिंग,फुगे,रिबीन बांधतात,  ज्याला जमेल तो रेशीमाची झुल विकत आणतो ,  नवीन कासरा(काथ्याची जाड दोरी)..अशा अनेक कौतुकाच्या गोष्टी.

दृष्ट लागू नये म्हणून पायात काळा दोरा आणि शिंगाना लिंबू मिरची,कडबोळी च तोरण बांधतात.  
पुरणपोळी,घुगऱ्या, भरडा(गहू,ज्वारी,मका,बाजरी एकत्र करून दळून आणलं जात) आणिनेवेद्य दाखवला जातो.


 ...ढोल ताशे,लेझीम, फटाके,गाणी...असा लवाजमा घेऊन गावात मिरवणूक काढली जाते ती ग्रामदेवतेच्या देवळा पर्यंत.
अशी मिरवणूक दोन ते अडीच तास चालते. एका बैला मागे दोन जण तरी असतातच.....

पूर्वी साधारण 30,35 बैला च्या जोड्या असायच्या,  पण हळूहळू त्याची जागा आता ट्रॅक्टर नी घेतली आहे....त्याची पण मिरवणूक काढली जाते
त्यामागचं कारण अस की ........
*शेतकऱ्याला त्याच्या सोबत कष्ट करणाऱ्या प्राण्याची आणि वस्तूची जाणीव*
आजच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे ते कौतुक देखील होऊ शकेल की नाही..काय माहीत😔😔
त्याला लॉक डाऊन नव्हतंच तो आपल्या सारख्यान साठी शेतात काम करतच होता आपल्या मालका बरोबर.
🐮👱🐮

लहानपणी शाळेत निबंध लिहायचो ते आठवलं
😊😊 एका सणाची माहिती लिहा.

Comments

  1. I knew it's TRUE STORY....NICELLLY Written

    ReplyDelete
  2. Congratulations Manisha

    वाचताना गावात फिरतोय असा भास होत होता . छान लिहिले आहे . All the best

    ReplyDelete
  3. फारच छान .लहानपणी गावी रहात असतांना हे सर्व अनुभवलं आहे त्याची आठवण ताजी झाली .

    ReplyDelete
  4. वाह खूप छान ,मी आता lockdown मध्ये घरी म्हणजे गावी आहे आणि या सगळ्या गोष्टी खूप जवळून अनुभवल्या आहेत बरीच वर्षे

    ReplyDelete
  5. बैलपोळा ह्या सणाचे खूप सुंदर वर्णन केले आहे. Very informative. ह्या सणाबद्दल आज मला बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या. बैल मालकाचा जो अनुभव सांगितला आहे तो वाचताना खूप छान वाटलं.

    ReplyDelete
  6. छान लिखाण,प्रसंग उभा केला...

    ReplyDelete
  7. छान विषय
    मस्त !

    ReplyDelete
  8. Ekdam bhari lahanpana chi athawan zaali.

    ReplyDelete
  9. मुक्या प्राण्यांच्या भावना समजू शकल्या तर च आपण माणूस... सहज वर्णन

    ReplyDelete
  10. Khup chan !! Agadi lanpanicha pola anubhavala aaj .., prasangik varnan chan ch . Apratim likhan .
    Thanks we will share it with new generations.

    ReplyDelete
  11. अश्विनी सुर्वेJuly 28, 2020 at 3:22 AM

    हा विचारप्रवाह सगळीकडे पोहोचायला हवा. छान लिहिलंय.

    ReplyDelete
  12. खूपच आवडली गोष्ट,खरेच मुकी जनावरे खूप जीव लावतात

    ReplyDelete
  13. वाचताना खुप मजा आली.
    मस्त.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

।।देवाचिये द्वारी उभा क्षणभरी।।

मागचे बरेच दिवस आपण विठू रखुमाईच्या जणू आजूबाजूला वावरत होतो,  एकीकडे वारी होणार नाही माहीत होतं तरी  मन  भक्ती करायला कमी पडत नव्हतं....  tv वर भजन ,कीर्तनाचा आनंद घेता येत होता, कोण हरिपाठ वाचत होत,तर कोणी विष्णूसहस्त्र नाम रोज  न चुकता म्हणत होत,  कुणी आपल्या  ग्रुपवर काही धार्मिक वाचनाचा उपक्रम  हाती घेतला होता . एकादशी दुप्पट खाशी 😝...उपवासाच्या पदार्थांची रेलचेल चालू होती ,सगळीकडे वेगवेगळ्या कृती दाखवल्या जात होत्या.... त्यातून देखील कुणीतरी  विठुराया तयार केला😇 आपल्या आपल्या भक्तीने  कोणी चित्र रंगवलं, तर कोणी सुरेल आवाजात भक्ती संगीत ऐकवलं,  अभंगा वर नृत्य सादर केलं....आणि असा आपला दिवस त्या सावळ्याच्या  नामघोषात  पार पडला.... प्रत्येकानी एकच मागण मागितलं असणार  आहे हे नक्की🙏 आज उगीचच एकदम शांत वाटत.. थोडीशी उदासी येऊन जाते... समजत नाही ,पण ... एक रिकामपण  वाटत. आणि परत जेव्हा एखादा अभंग  कानावर पडतो किंवा गुणगुणला जातो ... की परत एक  *संजीवनी*  मिळाल्याचा आनंद होतो...😇 ।।...

मनःशांती..दृष्टिकोन आपला,नजर आपली.

आज गेले होते खरेदीला ला.. " मनशांती" कुठे मिळते का ते बघायला... ********************** एक दुकानदार म्हणाला, "आमच्या कडे नाही.. त्या समोरच्या दुकानात विचारा" तिथे जाऊन चौकशी केली तर.. दुकानदार  हसून  म्हणाला .. " अस  काही विचारा जे  समजेल  मला" *********************** अशी दोन चार दुकान शोधून झाली.... मनशांती कुठेच नाही मिळाली.. *********************** अचानक ....... एका दुकानाच्या बाहेर लिहली होती पाटी  फक्त नाव सांगा  पाहिजे ते मिळेल. ...... वाचून खूप आनंद झाला😊 विचारून तर बघू  आहे की नाही  हे तरी कळेल.... ******************* दोन पायरी वर गेल्यावर दुसरी पाटी दिसली 😊 हसत मुखाने आत या " लिहल होत त्यावर"   बाहेरच  ठेवा  तुमचा  "राग  आणि  तेवर "😡🤨 *********************** वाचून थोडा विचार केला बघू तरी करून..... चप्पल👡बरोबर काढून ठेवला   मनाचा एक  टोचणार त्रिकोण....🔺 ********************* दार आत ढकला  लिहल होत  पुढच्या पाटीवर...⤴️ मनाचा पण कप्पा   हलकेच उघडा  आपल्या ...

Shambhar varsha purvi....

आज  जाहली  100वर्षे  पूर्ण  अनंतात विलीन होऊन..... नांव असे स्वातंत्र्यविराचे "केशव गंगाधर टिळक" किर्तीस आला  *बाळ*  नाव घेऊन..... रत्नागिरी जिल्हा,दापोली तालुका.. चिखली गावात जन्म घेतला गंगाधर-पार्वती दाम्पत्या पोटी..... लहानपणी अन्याय सहन न करणे  आणि कुशाग्र बुद्धी... "मी शेंगा खाल्या नाहीत मी टरफल उचलणार नाही"....इथं पासून "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" ....इथं पर्यँत लहान वयात हरपले   मातेचे छाया छत्र..... वय वर्ष सोळा, विवाह बंधनात अडकले दहा वर्षाच्या तापीबाई समवेत पित्याचा आशिर्वाद मिळाला मात्र... पोहणे,व्यायाम करणे,नौका चालवणे.. संस्कृत आणि गणित विषय आवडणे.... काही दिवस शिक्षकी पेशा  पैशासाठी निवडणे... B.A. , L L B पदवी घेता जागी झाली देशभक्ती.... इंग्रज सरकार राज्य खुपू लागले वाटू लागले का असावी अशी ही सक्ती.... घेतला वसा स्वातंत्र्याचा सामान्य लोका समजावे म्हणून.....  केली उभारणी शाळा,कॉलेजची परखड पणे मते मांडली  मराठा व केसरी वृत्तपत्रातून..... समाजातील दोन्ही पिढ्या असाव्या एकत्र...