🏘️आमच्या गावी एका शेतकऱ्याच्या घरात घडलेली गोष्ट तुम्हाला सांगते.
शेतकरी म्हटला की घरात कोंबड्या, गाईगुर असणारच. राखणीला एखाद कुत्र पण असत.
मालक,घरातील माणस आणि हे प्राणी.. त्यांना एकमेकांची खूप सवय लागलेली असते. एक प्रेम ,जिव्हाळा तयार झालेला असतो...
(आपल्या शहरी भाषेत सांगायचं झालं तर *जबरदस्त "Bonding"*...)
तर एकदा काय झालं...........
गुरांना चारा आण्यासाठी डोंगरावर जायला लागायचं. मालकाने बैलांना गाडीला जुंपल. त्यातल्या एका बैलाच नाव होतं "चतुर"😊.
अस ऐकून आहे की खरंच तो अतिशय हुशार आणि प्रेमळ होता.घरातील कोणी पाया जवळ जरी बसल तरी काही करत नसे.
....जाताना गाडी मोकळी होती,त्यामुळे कदाचित ती पळायला हलकी असेल. गाडी डोंगरावर पोचली. मालकाने पूर्ण गवत तोडून चारा गोळा केला. हळूहळू चाऱ्याने गाडी भरली,पेंढ्या तयार झाल्या....
तो पर्यंत हळूहळू अंधार पडायला लागला होता. डोंगरावर एकच गाडी एका वेळेला जाईल अशी पायवाट होती. एकबाजूला तस दरी सारखाच की .
गाडी घराकडे यायला निघाली, पुढे थोडं अंतर गेल्यावर गाडीतल्या पेंढ्यानी कदाचित गाडी जड झाली असल्यामुळे अंदाज चुकला आणि गाडी उलटली,दोन्ही बैल घसरले मालक वरून खाली पडले ते "चतुर" बैलाच्या पायात...
पुढचा अनुभव तीच व्यक्ती सांगू शकते जिने हे अनुभवलं ते म्हणजे त्या मालकाने... एका जरी बैलाने लाथ मारली असती ,पाय हलवले असते तर सगळं सगळं संपल असत..
जणू त्या बैला ला पूर्ण कल्पना आली होती...त्यानी पूर्ण पाय जमिनीत रोउन ठेवले, त्याने दुसऱ्या बैलाला देखील हालू दिल नाही..
काय घडलंय हे समजायला काही वेळ गेला. ...मालकाने हळूहळू उठण्याचा प्रयत्न केला तो त्याबैलाच्या पायाच्या आधारानेच...
हळूहळू स्वतःला आणि बैलांना सही सलामत बाहेर काढल..
कसे पांग फेडू रे अस म्हणून मालकाने घट्ट मिठी मारली आणि आपल्या अश्रूंना वाट करून दिली.....आणि गाडी घराकडे निघाली.
*एका मुक्या प्राण्याने आपली जबाबदारी आणि इमान पणाला लावून* मालकाला सुखरूप घरी आणलं😊😊
अशा अनेक घटना घडत असतील,अनुभव येत असेल. म्हणूनच त्या प्राण्याचे जे ऋण आहे ते फेडायलाच बैलपोळा साजरा केला जात असेल कदाचित.
आदल्या दिवशी *खांद मळणी* करतात
हळद आणि तेल एकत्र करून बैलांना पूर्ण अंगाला लावून ,चोळून कदाचित क्षीण बाहेर काढतात. त्या मागची भावना पण ही असते की वर्षभर तो जे आपल्या साठी करतो म्हणून त्त्याची सेवा आपण करायची.
रात्री त्याला बाजरीच्या घुगऱ्या करून जेवू घालतात,एक पौष्टिक अन्न म्हणून.
दुसऱ्या दिवशी बैलांना आंघोळ घातली जाते. शिंगांना रंग लावतात, अंगावर पण काही डिजाईन किंवा पूर्ण रंगवलं जात, काही वेळेला म्हणे आदल्या दिवशी मेंदीने पण रंगवलं जात, ते खूप छान दिसत दुसऱ्या दिवशी.
डोळ्यात काजळ,गळ्यात घुंघराचे चाळ, शिंगावर बाशिंग,फुगे,रिबीन बांधतात, ज्याला जमेल तो रेशीमाची झुल विकत आणतो , नवीन कासरा(काथ्याची जाड दोरी)..अशा अनेक कौतुकाच्या गोष्टी.
दृष्ट लागू नये म्हणून पायात काळा दोरा आणि शिंगाना लिंबू मिरची,कडबोळी च तोरण बांधतात.
...ढोल ताशे,लेझीम, फटाके,गाणी...असा लवाजमा घेऊन गावात मिरवणूक काढली जाते ती ग्रामदेवतेच्या देवळा पर्यंत.
पूर्वी साधारण 30,35 बैला च्या जोड्या असायच्या, पण हळूहळू त्याची जागा आता ट्रॅक्टर नी घेतली आहे....त्याची पण मिरवणूक काढली जाते
त्यामागचं कारण अस की ........
*शेतकऱ्याला त्याच्या सोबत कष्ट करणाऱ्या प्राण्याची आणि वस्तूची जाणीव*
आजच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे ते कौतुक देखील होऊ शकेल की नाही..काय माहीत😔😔
त्याला लॉक डाऊन नव्हतंच तो आपल्या सारख्यान साठी शेतात काम करतच होता आपल्या मालका बरोबर.
🐮👱🐮
लहानपणी शाळेत निबंध लिहायचो ते आठवलं
😊😊 एका सणाची माहिती लिहा.
I knew it's TRUE STORY....NICELLLY Written
ReplyDeleteCongratulations Manisha
ReplyDeleteवाचताना गावात फिरतोय असा भास होत होता . छान लिहिले आहे . All the best
Supar very nice
Deleteफारच छान .लहानपणी गावी रहात असतांना हे सर्व अनुभवलं आहे त्याची आठवण ताजी झाली .
ReplyDeleteवाह खूप छान ,मी आता lockdown मध्ये घरी म्हणजे गावी आहे आणि या सगळ्या गोष्टी खूप जवळून अनुभवल्या आहेत बरीच वर्षे
ReplyDeleteVery nice!
ReplyDeleteबैलपोळा ह्या सणाचे खूप सुंदर वर्णन केले आहे. Very informative. ह्या सणाबद्दल आज मला बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या. बैल मालकाचा जो अनुभव सांगितला आहे तो वाचताना खूप छान वाटलं.
ReplyDeleteKhup chan lile aahes
ReplyDeleteKhup chan lihile aahes
ReplyDeleteछान लिखाण,प्रसंग उभा केला...
ReplyDeleteछान विषय
ReplyDeleteमस्त !
Ekdam bhari lahanpana chi athawan zaali.
ReplyDeleteमुक्या प्राण्यांच्या भावना समजू शकल्या तर च आपण माणूस... सहज वर्णन
ReplyDeleteKhup chan !! Agadi lanpanicha pola anubhavala aaj .., prasangik varnan chan ch . Apratim likhan .
ReplyDeleteThanks we will share it with new generations.
Sundar
ReplyDeleteएकच नंबर
ReplyDeleteउत्कृष्ठ
ReplyDeleteउत्कृष्ठ
ReplyDeleteChaan
ReplyDeleteहा विचारप्रवाह सगळीकडे पोहोचायला हवा. छान लिहिलंय.
ReplyDeleteखूपच आवडली गोष्ट,खरेच मुकी जनावरे खूप जीव लावतात
ReplyDeleteवाचताना खुप मजा आली.
ReplyDeleteमस्त.