"जग हे बंदिशाळा"... 🎶🎶
हे गाणं खरंच सत्यात उतरलय अस वाटतंय... बघता बघता चार महिने उलटून गेले ह्या लॉक डाऊन ला....
कुठून तो रोग आला ...
काय तर म्हणे कोरोना
(मुडदा बशवीला त्याचा)..😡...खरंच अस म्हणायची वेळ आली आहे.
कोण करतय आणि कोण भोगतय...
अस सगळ्या जगाचं झालं आहे.
कधी वाटलंच नव्हतं ..अस संकट एकदम सगळी कडे येईल, ...आणि होत्या च नव्हतं होईल.
बर अजून पुढे काय वाढून ठेवलंय हे ही माहीत नाही.
हे अस.. कुठपर्यँत आणि किती चालणार.
माणसांची सहन करण्याची शक्ती खरतर संपत आलीये.
धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय अशी परिस्थिती होऊन बसलीये.
रोज काही तरी नवीन अनुभव, किस्से
....ऐकायला, बघायला मिळतायत.
चांगले,वाईट सगळं आहे त्यात.
जितकी माणसं,कुटुंब तितक्या समस्या वाढत आहेत, हे नक्की.
आणि मनुष्यधर्माच्या स्वभावा नुसार.. प्रत्येक जण दुसऱ्याला नाव ठेवतो आहे.(समजलं असेलच कोणाला उद्देशून हे लिहल आहे..शहाण्यास शब्दाचा मार)
खरतर आताची परिस्थिती खूप अवघड आणि न समजणारी आहे....
काय करायचं हे ठरवायच्या आत शत्रू आपल्या हद्दीत शिरला आहे...तेव्हा
थोडी आपली जबाबदारी आपणच घ्या..
आलेली परिस्थिती नक्की जाईल..
ह्यावर विश्वास ठेवा....
सारखे तेच तेच मेसेज आणि व्हिडीओ पाठवून
चिंता वाढवून घेऊ नका...आणि समोरच्याला पण देऊ नका...
बोलणं किंवा दुसऱ्याला उपदेश देणं सोपं आहे... अस म्हणतात...पण मग बुडत्याला काडीचा आधार असे ही म्हणतात ...त्याच धर्तीवर काठावर असलेल्यानी थोडा आधार दिला तर काय बिघडलं.
कोरोना आज ना उद्या नक्की निघून जाईलच ...
येणारा काळ अवघड आहे
पण आपल्याला एकमेकांना सांभाळून राहील पाहिजे. आर्थिक घडी बसायला वेळ लागणार आहे.
एक छान feeling आलं...🤗
जसे श्रावणाचे वेध लागले..
तस आपण सर्वांनी दीप अमावस्या पासून ..
दिवे लावून..
गणपतीचे पण वेध लागले आहेत..
काही नियमांचे पालन आपण करणार आहोत.
हे ही किती छान ....
आज ..आपण सगळेच ऐका बोटीतील सहप्रवासी आहोत
माहीत नाही उद्या काय..?
म्हणूनच..
एक ऊर्जा घेऊन जगायला सुरुवात करायला
हरकत आहे 😊😊?
Mastach sandesh
ReplyDeleteReality.......... 👍👌
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteसोपी पद्धत... ब्लॉग छान आहेत..
ReplyDeleteसकारात्मक विचार ठेऊन जगा सर्व सुरळीत होईल .
ReplyDeleteHappiness comes in waves it will find us again .
ReplyDeleteNice blog !!!
हो एक सकारात्मक ऊर्जा नक्कीचं मिळेल.
ReplyDelete