Skip to main content

"जग हे बंदिशाळा"....असच होऊन बसलंय

     "जग हे बंदिशाळा"... 🎶🎶
हे गाणं खरंच सत्यात उतरलय अस वाटतंय...  बघता बघता चार महिने उलटून गेले ह्या लॉक डाऊन ला.... 
 कुठून तो रोग आला ...
काय तर म्हणे कोरोना 
(मुडदा बशवीला त्याचा)..😡...खरंच अस म्हणायची वेळ आली आहे.

कोण करतय आणि कोण भोगतय...
अस सगळ्या जगाचं झालं आहे.

कधी वाटलंच नव्हतं ..अस संकट एकदम सगळी कडे येईल, ...आणि होत्या च नव्हतं होईल.
बर अजून पुढे काय वाढून ठेवलंय हे ही माहीत नाही. 
हे अस.. कुठपर्यँत आणि किती चालणार.
माणसांची सहन करण्याची शक्ती खरतर संपत आलीये.  
धरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतय अशी परिस्थिती होऊन बसलीये.
रोज काही तरी नवीन अनुभव, किस्से
....ऐकायला, बघायला मिळतायत.
चांगले,वाईट सगळं आहे त्यात.
जितकी माणसं,कुटुंब तितक्या समस्या वाढत आहेत, हे नक्की.

आणि मनुष्यधर्माच्या स्वभावा नुसार..  प्रत्येक जण  दुसऱ्याला नाव ठेवतो आहे.(समजलं असेलच कोणाला उद्देशून हे लिहल आहे..शहाण्यास शब्दाचा मार)

खरतर आताची परिस्थिती खूप अवघड आणि न समजणारी आहे....
काय करायचं हे ठरवायच्या आत शत्रू आपल्या हद्दीत शिरला आहे...तेव्हा
थोडी आपली जबाबदारी आपणच घ्या..
आलेली परिस्थिती नक्की जाईल..
ह्यावर विश्वास ठेवा....
सारखे तेच तेच मेसेज आणि व्हिडीओ पाठवून
चिंता वाढवून घेऊ नका...आणि समोरच्याला पण देऊ नका...
सकारात्मक रहा...
बोलणं  किंवा  दुसऱ्याला उपदेश देणं सोपं आहे... अस म्हणतात...पण मग बुडत्याला काडीचा आधार असे ही म्हणतात ...त्याच धर्तीवर काठावर असलेल्यानी थोडा आधार दिला तर काय बिघडलं.

कोरोना आज ना उद्या नक्की निघून जाईलच ...
येणारा काळ अवघड आहे
पण आपल्याला एकमेकांना सांभाळून राहील पाहिजे. आर्थिक घडी बसायला वेळ लागणार आहे.

एक छान feeling आलं...🤗
जसे श्रावणाचे वेध लागले..
तस आपण सर्वांनी दीप अमावस्या पासून ..
दिवे लावून..
एक प्रकाशमय आयुष्याची सुरवात तर नक्कीच केली आहे.
गणपतीचे पण वेध लागले आहेत..
काही नियमांचे पालन आपण करणार आहोत.
हे ही किती छान ....

 आज ..आपण सगळेच ऐका बोटीतील सहप्रवासी आहोत
माहीत नाही उद्या काय..?

म्हणूनच..
 एक ऊर्जा घेऊन जगायला सुरुवात करायला
 हरकत आहे 😊😊?









Comments

  1. सोपी पद्धत... ब्लॉग छान आहेत..

    ReplyDelete
  2. सकारात्मक विचार ठेऊन जगा सर्व सुरळीत होईल .

    ReplyDelete
  3. Happiness comes in waves it will find us again .
    Nice blog !!!

    ReplyDelete
  4. हो एक सकारात्मक ऊर्जा नक्कीचं मिळेल.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

।।देवाचिये द्वारी उभा क्षणभरी।।

मागचे बरेच दिवस आपण विठू रखुमाईच्या जणू आजूबाजूला वावरत होतो,  एकीकडे वारी होणार नाही माहीत होतं तरी  मन  भक्ती करायला कमी पडत नव्हतं....  tv वर भजन ,कीर्तनाचा आनंद घेता येत होता, कोण हरिपाठ वाचत होत,तर कोणी विष्णूसहस्त्र नाम रोज  न चुकता म्हणत होत,  कुणी आपल्या  ग्रुपवर काही धार्मिक वाचनाचा उपक्रम  हाती घेतला होता . एकादशी दुप्पट खाशी 😝...उपवासाच्या पदार्थांची रेलचेल चालू होती ,सगळीकडे वेगवेगळ्या कृती दाखवल्या जात होत्या.... त्यातून देखील कुणीतरी  विठुराया तयार केला😇 आपल्या आपल्या भक्तीने  कोणी चित्र रंगवलं, तर कोणी सुरेल आवाजात भक्ती संगीत ऐकवलं,  अभंगा वर नृत्य सादर केलं....आणि असा आपला दिवस त्या सावळ्याच्या  नामघोषात  पार पडला.... प्रत्येकानी एकच मागण मागितलं असणार  आहे हे नक्की🙏 आज उगीचच एकदम शांत वाटत.. थोडीशी उदासी येऊन जाते... समजत नाही ,पण ... एक रिकामपण  वाटत. आणि परत जेव्हा एखादा अभंग  कानावर पडतो किंवा गुणगुणला जातो ... की परत एक  *संजीवनी*  मिळाल्याचा आनंद होतो...😇 ।।...

मनःशांती..दृष्टिकोन आपला,नजर आपली.

आज गेले होते खरेदीला ला.. " मनशांती" कुठे मिळते का ते बघायला... ********************** एक दुकानदार म्हणाला, "आमच्या कडे नाही.. त्या समोरच्या दुकानात विचारा" तिथे जाऊन चौकशी केली तर.. दुकानदार  हसून  म्हणाला .. " अस  काही विचारा जे  समजेल  मला" *********************** अशी दोन चार दुकान शोधून झाली.... मनशांती कुठेच नाही मिळाली.. *********************** अचानक ....... एका दुकानाच्या बाहेर लिहली होती पाटी  फक्त नाव सांगा  पाहिजे ते मिळेल. ...... वाचून खूप आनंद झाला😊 विचारून तर बघू  आहे की नाही  हे तरी कळेल.... ******************* दोन पायरी वर गेल्यावर दुसरी पाटी दिसली 😊 हसत मुखाने आत या " लिहल होत त्यावर"   बाहेरच  ठेवा  तुमचा  "राग  आणि  तेवर "😡🤨 *********************** वाचून थोडा विचार केला बघू तरी करून..... चप्पल👡बरोबर काढून ठेवला   मनाचा एक  टोचणार त्रिकोण....🔺 ********************* दार आत ढकला  लिहल होत  पुढच्या पाटीवर...⤴️ मनाचा पण कप्पा   हलकेच उघडा  आपल्या ...

Shambhar varsha purvi....

आज  जाहली  100वर्षे  पूर्ण  अनंतात विलीन होऊन..... नांव असे स्वातंत्र्यविराचे "केशव गंगाधर टिळक" किर्तीस आला  *बाळ*  नाव घेऊन..... रत्नागिरी जिल्हा,दापोली तालुका.. चिखली गावात जन्म घेतला गंगाधर-पार्वती दाम्पत्या पोटी..... लहानपणी अन्याय सहन न करणे  आणि कुशाग्र बुद्धी... "मी शेंगा खाल्या नाहीत मी टरफल उचलणार नाही"....इथं पासून "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" ....इथं पर्यँत लहान वयात हरपले   मातेचे छाया छत्र..... वय वर्ष सोळा, विवाह बंधनात अडकले दहा वर्षाच्या तापीबाई समवेत पित्याचा आशिर्वाद मिळाला मात्र... पोहणे,व्यायाम करणे,नौका चालवणे.. संस्कृत आणि गणित विषय आवडणे.... काही दिवस शिक्षकी पेशा  पैशासाठी निवडणे... B.A. , L L B पदवी घेता जागी झाली देशभक्ती.... इंग्रज सरकार राज्य खुपू लागले वाटू लागले का असावी अशी ही सक्ती.... घेतला वसा स्वातंत्र्याचा सामान्य लोका समजावे म्हणून.....  केली उभारणी शाळा,कॉलेजची परखड पणे मते मांडली  मराठा व केसरी वृत्तपत्रातून..... समाजातील दोन्ही पिढ्या असाव्या एकत्र...