Skip to main content

मनःशांती..दृष्टिकोन आपला,नजर आपली.

आज गेले होते खरेदीला ला..
"मनशांती" कुठे मिळते का ते बघायला...
**********************
एक दुकानदार म्हणाला, "आमच्या कडे नाही..
त्या समोरच्या दुकानात विचारा"
तिथे जाऊन चौकशी केली तर..
दुकानदार  हसून  म्हणाला ..
"अस  काही विचारा जे  समजेल  मला"
***********************
अशी दोन चार दुकान शोधून झाली....
मनशांती कुठेच नाही मिळाली..
***********************
अचानक.......
एका दुकानाच्या बाहेर लिहली होती पाटी 
फक्त नाव सांगा 
पाहिजे ते मिळेल.......
वाचून खूप आनंद झाला😊
विचारून तर बघू 
आहे की नाही 
हे तरी कळेल....
*******************
दोन पायरी वर गेल्यावर
दुसरी पाटी दिसली
😊हसत मुखाने आत या
"लिहल होत त्यावर"
 बाहेरच  ठेवा  तुमचा
 "राग  आणि  तेवर"😡🤨
***********************
वाचून थोडा विचार केला
बघू तरी करून.....
चप्पल👡बरोबर काढून ठेवला
 मनाचा एक  टोचणार त्रिकोण....🔺
*********************

दार आत ढकला
 लिहल होत 
पुढच्या पाटीवर...⤴️
मनाचा पण कप्पा  
हलकेच उघडा 
आपल्या हिमतीवर...🥰💪🏿
********************
आत  गेल्यावर  बघितल
पाण्याने भरले होते 
 अर्धे अर्धे ग्लास
लिहल होत पाटीवर..
*अर्ध पिऊन वाया घालवायच की..🤔
अर्ध पिऊन समाधान मानायचं..*😌😌
***********************
शॉपिंग साठी
एक,एक पिशवी
 अडकवलेली...
किंमत  मात्र  प्रत्येक 
बॅग ची वेगवेगळी ....
***********************
पुढची पाटी वाचून थोडं
हसायला आलं....
आधी  आपल्या  खिशाकडून
 परवानगी घ्या..👜👝
मगच आपला वेळ
 शॉपिंग ला द्या
***********************
राग, लोभ,  प्रेम, द्वेष....
 मत्सर  आणि  कर्तव्य ...
अशा  भरून  ठेवल्या  होत्या...
काचेच्या बरण्या..
हवी ती घ्या..
हवी ती घ्या...
कारण..
 एका  वर  एक  आहे  फ्री ....
ओळखून आपली  प्रकृती..
**************************

इकडे तिकडे  लक्ष जात होतं..
थोडा विचार केला..तर

कोण कुठली बरणी घेतंय..
 म्हणून मी का अस्वस्थ होतोय..
***********************
आणि इथेच...😌
***********************
जे घ्यायला आलो होतो..
त्याच उत्तर  ..
पाटी  वर  लिहिलेल्या ..
सुचनांनी  मिळालं..
ते माझ्या स्वताच्या हातात होत...
फक्त ते आता ...
मन,मेंदू,आणि शरीराच्या
बॅग मधे भरायचं होत.
😊🙏
***********************

खरतर मनःशांती ही कधीच 
बाहेरून मिळत नाही. 
आपल्या जवळच असते 
त्याची जाणिव फक्त व्हावी लागते.

Comments

  1. खरं आहे
    सुनील देशमुख

    ReplyDelete
  2. Very true and talks about reality

    ReplyDelete
  3. Khupach chaan. Asa pan dukan asayala hawa na.

    ReplyDelete
  4. सुंदर लिहिलंय. खरंच हा दृष्टिकोन सर्वांनी बाळगायला हवा.

    ReplyDelete
  5. खूप छान.. लिखाणाची शैली आवडली..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

।।देवाचिये द्वारी उभा क्षणभरी।।

मागचे बरेच दिवस आपण विठू रखुमाईच्या जणू आजूबाजूला वावरत होतो,  एकीकडे वारी होणार नाही माहीत होतं तरी  मन  भक्ती करायला कमी पडत नव्हतं....  tv वर भजन ,कीर्तनाचा आनंद घेता येत होता, कोण हरिपाठ वाचत होत,तर कोणी विष्णूसहस्त्र नाम रोज  न चुकता म्हणत होत,  कुणी आपल्या  ग्रुपवर काही धार्मिक वाचनाचा उपक्रम  हाती घेतला होता . एकादशी दुप्पट खाशी 😝...उपवासाच्या पदार्थांची रेलचेल चालू होती ,सगळीकडे वेगवेगळ्या कृती दाखवल्या जात होत्या.... त्यातून देखील कुणीतरी  विठुराया तयार केला😇 आपल्या आपल्या भक्तीने  कोणी चित्र रंगवलं, तर कोणी सुरेल आवाजात भक्ती संगीत ऐकवलं,  अभंगा वर नृत्य सादर केलं....आणि असा आपला दिवस त्या सावळ्याच्या  नामघोषात  पार पडला.... प्रत्येकानी एकच मागण मागितलं असणार  आहे हे नक्की🙏 आज उगीचच एकदम शांत वाटत.. थोडीशी उदासी येऊन जाते... समजत नाही ,पण ... एक रिकामपण  वाटत. आणि परत जेव्हा एखादा अभंग  कानावर पडतो किंवा गुणगुणला जातो ... की परत एक  *संजीवनी*  मिळाल्याचा आनंद होतो...😇 ।।...

Shambhar varsha purvi....

आज  जाहली  100वर्षे  पूर्ण  अनंतात विलीन होऊन..... नांव असे स्वातंत्र्यविराचे "केशव गंगाधर टिळक" किर्तीस आला  *बाळ*  नाव घेऊन..... रत्नागिरी जिल्हा,दापोली तालुका.. चिखली गावात जन्म घेतला गंगाधर-पार्वती दाम्पत्या पोटी..... लहानपणी अन्याय सहन न करणे  आणि कुशाग्र बुद्धी... "मी शेंगा खाल्या नाहीत मी टरफल उचलणार नाही"....इथं पासून "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" ....इथं पर्यँत लहान वयात हरपले   मातेचे छाया छत्र..... वय वर्ष सोळा, विवाह बंधनात अडकले दहा वर्षाच्या तापीबाई समवेत पित्याचा आशिर्वाद मिळाला मात्र... पोहणे,व्यायाम करणे,नौका चालवणे.. संस्कृत आणि गणित विषय आवडणे.... काही दिवस शिक्षकी पेशा  पैशासाठी निवडणे... B.A. , L L B पदवी घेता जागी झाली देशभक्ती.... इंग्रज सरकार राज्य खुपू लागले वाटू लागले का असावी अशी ही सक्ती.... घेतला वसा स्वातंत्र्याचा सामान्य लोका समजावे म्हणून.....  केली उभारणी शाळा,कॉलेजची परखड पणे मते मांडली  मराठा व केसरी वृत्तपत्रातून..... समाजातील दोन्ही पिढ्या असाव्या एकत्र...