"मनशांती" कुठे मिळते का ते बघायला...
**********************
एक दुकानदार म्हणाला, "आमच्या कडे नाही..
त्या समोरच्या दुकानात विचारा"
तिथे जाऊन चौकशी केली तर..
दुकानदार हसून म्हणाला ..
"अस काही विचारा जे समजेल मला"
***********************
अशी दोन चार दुकान शोधून झाली....
मनशांती कुठेच नाही मिळाली..
***********************
अचानक.......
एका दुकानाच्या बाहेर लिहली होती पाटी
फक्त नाव सांगा
पाहिजे ते मिळेल.......
वाचून खूप आनंद झाला😊
विचारून तर बघू
आहे की नाही
हे तरी कळेल....
*******************
दोन पायरी वर गेल्यावर
दुसरी पाटी दिसली
😊हसत मुखाने आत या
"लिहल होत त्यावर"
बाहेरच ठेवा तुमचा
"राग आणि तेवर"😡🤨
***********************
वाचून थोडा विचार केला
बघू तरी करून.....
चप्पल👡बरोबर काढून ठेवला
मनाचा एक टोचणार त्रिकोण....🔺
*********************
दार आत ढकला
लिहल होत
पुढच्या पाटीवर...⤴️
मनाचा पण कप्पा
हलकेच उघडा
आपल्या हिमतीवर...🥰💪🏿
********************
आत गेल्यावर बघितल
पाण्याने भरले होते
अर्धे अर्धे ग्लास
लिहल होत पाटीवर..
*अर्ध पिऊन वाया घालवायच की..🤔
अर्ध पिऊन समाधान मानायचं..*😌😌
***********************
शॉपिंग साठी
एक,एक पिशवी
अडकवलेली...
किंमत मात्र प्रत्येक
बॅग ची वेगवेगळी ....
***********************
पुढची पाटी वाचून थोडं
हसायला आलं....
आधी आपल्या खिशाकडून
परवानगी घ्या..👜👝
मगच आपला वेळ
शॉपिंग ला द्या
***********************
राग, लोभ, प्रेम, द्वेष....
मत्सर आणि कर्तव्य ...
अशा भरून ठेवल्या होत्या...
काचेच्या बरण्या..
हवी ती घ्या..
हवी ती घ्या...
कारण..
एका वर एक आहे फ्री ....
ओळखून आपली प्रकृती..
**************************
इकडे तिकडे लक्ष जात होतं..
थोडा विचार केला..तर
कोण कुठली बरणी घेतंय..
म्हणून मी का अस्वस्थ होतोय..
***********************
आणि इथेच...😌
***********************
जे घ्यायला आलो होतो..
त्याच उत्तर ..
पाटी वर लिहिलेल्या ..
सुचनांनी मिळालं..
ते माझ्या स्वताच्या हातात होत...
फक्त ते आता ...
मन,मेंदू,आणि शरीराच्या
बॅग मधे भरायचं होत.
😊🙏
***********************
खरतर मनःशांती ही कधीच
बाहेरून मिळत नाही.
आपल्या जवळच असते
त्याची जाणिव फक्त व्हावी लागते.
मस्त
ReplyDeleteWoooW WooooW
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteVery true 💯
ReplyDeleteखरं आहे
ReplyDeleteसुनील देशमुख
Chaanch 👌
ReplyDeleteNice
ReplyDeleteTrue
ReplyDeleteछान
ReplyDeleteKhup sunder 👌👌👌
ReplyDeleteछान च
ReplyDeleteVery true, nice
ReplyDeleteसही है 👌
ReplyDeleteVery true and talks about reality
ReplyDeleteKhupach chaan. Asa pan dukan asayala hawa na.
ReplyDeleteसुंदर लिहिलंय. खरंच हा दृष्टिकोन सर्वांनी बाळगायला हवा.
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteखूप छान.. लिखाणाची शैली आवडली..
ReplyDelete