Skip to main content

मृगजळ

 जे जे गुरु स्थानी आहेत त्या सर्वांना प्रथम त्रिवार वंदन।।.....🙏🙏

उपदेश देणाराच गुरू असतो  
अस नाही  तर  किती तरी वेळा आपल्या आजूबाजूला देखील, सहज मधे कोणी तरी चांगलं शिकवून जात ,सल्ला देत.
एक आधार  मिळतो ....
तो कुठल्या स्वरूपात मिळतो हे प्रत्येकाचे प्रत्येकाला च माहीत असत.....
👩‍🦰👨‍🦰
काळजी करणारे..
आपली जबाबदारी स्वीकारणारे..
आपल्या आवडी निवडी पूर्ण करणारे..
चुकलं तर वेळीच शिक्षा देणारे...
चांगलं वाईट  सांगणारे...
आपले पहिले गुरू  
*आई वडील* 
च असतात ....
👨‍🦰👩‍🦰

गर्भात असल्या पासून आई ला  बाळाची काळजी घ्यावी लागते...... आपल्या संस्कृती मधे म्हणूनच गर्भ संस्कारा ला महत्व दिलं आहे...🤰😇
मग ह्यातूनच येणाऱ्या नवीन पिढीचा विचार मनात येतो...
म्हणून...
आज मी  थोडं new generation बद्दल लिहीणार आहे....
आज काल च वातावरणच बदल आहे, 
काही  निसर्गाचे नियम बदले आहेत...
उगाचच काहीतरी वेगळ्या कल्पनेत जगतिये नाविन पिढी.
कामाचा नको एवढा ताण,
फॅशन म्हणून व्यसन केलं जातंय....
मुला मुलींनो चुकीचा मार्ग निवडताय.
मृगजळ हा शब्द कदाचित ह्या पिढीला समजणार नाही...
ही पिढी त्याच्याच मागे धावतीये.
पिच्चर मधे दाखवल्या जाणाऱ्या  ग्लॅमर चा परिणाम होतोय... 
कसे बिनधास्त पैसे उडवतात 
काय बिनधास्त राहतात...
ह्या गोष्टीचा प्रभाव पडतोय...
पण हे समजत नाही...   
ह्याच acting चे तर त्यांना पैसे मिळतात.  
स्वतःच्या आयुष्यात अगदी सहज आणि साधेपणाने राहात असतील ही actor मंडळी...
आपल्या कडे वाईट तेवढ घेतलं जातंय.😔

आपल्या आजू बाजूला काय चांगलं घडतंय ते बघा...
खूप सकारात्मक गोष्टी आहेत घेण्यासारख्या.
चांगल ऐकू शकता,🎶
वाचू शकता.📖

स्वताच भल कशात आहे हे समजून घ्या....
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कधी जाऊ नका
कारण
प्रवाह आणि दिशा ह्या कधीच बदलत नाहीत

Comments

  1. सुंदर लिखाण.

    ReplyDelete
  2. 👍🏼👍🏼👍🏼👍🏼

    ReplyDelete
  3. Write up is good but need more examples to impress your views.

    ReplyDelete
    Replies
    1. Okk, thanks... तुमच्या सजेशन बद्दल, मला अजून दोन,तीन parents नी पर्सनल मेसेज केलाय ह्या विषयावर अजून थोडं लिही, नक्की विचार करून लिहिते.

      Delete
  4. Very true!!! Perfect Word for this Generation Mrugjal !!

    ReplyDelete
  5. AZUN VICHAR CHALALE ASATE...APURNA WATALA KUTHETARI.....

    ReplyDelete
  6. काळाप्रमाणे बदल हे होतच राहणार .नवीन पिढीला अनेक सुविधा प्राप्त झाल्या आहेत ज्या पूर्वीच्या पिढीला नव्हत्या . आई वडील दोघेही नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर रहात असल्यामुळे मुलांशी संपर्क कमी झाला आहे . पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत वडीलधारी मंडळी मुलांवर लक्ष ठेवीत तीही पद्धत मोडीत निघाली आहे .

    ReplyDelete
  7. Awesome, me tumchi fan jhali

    आजच्या काळातील पिढीला संघर्ष खूप आहेत व सगळ्या गोष्टी easily accessible आहेत. मृगजळ समजेपर्यंत कधी कधी वेळ निघून गेलेली असते.

    कधी कधी मला वाटते की आपण पालक जेव्हा का चुकले व कोठे चुकले ह्याचा हिशोब करतो तेव्हा आपले ही काही तरी चुकले होते ह्याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल.,ब्लॉग नंबर 5 मधे अजून लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे,बघू जमतंय लिहायला.

      Delete
  8. खरचं कस सांगावं या नवीन पिढी ला. आपणच दोन टोकाच्या पिढ्यांना जवळून बघतोय. म्हणून तर समजते हे मृगजळ आहे.

    ReplyDelete

Post a Comment