Skip to main content

"मी अनुभवलेली वारी"


।।माऊली,माऊली,माऊली..।।

"या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला"...केशवदास ह्यांचा हा अभंग खरंच  अनुभवास येतो जेव्हा पायी चालणाऱ्या वारीतले आपण एक वारकरी असतो. त्या विठोबा रखुमाईची ओढ लागलेली असते....  
मी स्वतः हा अनुभवलेला अनुभव माझ्या शब्दात लिहिण्याचा एक प्रयत्न.

       आळंदी ते पंढरपूर  ज्ञानेश्वर माऊलीची पालखी हा एक सुंदर प्रवास आहे... तसतर जे पायी पूर्ण वारी करतात ते अवघड,किचकट आणि वेदनादायी आहे...मात्र एक ओढ च ती पूर्ण करून घेते...  
खूप लिहण्या सारख आहे...माऊली माऊली माऊली शिवाय काही ऐकू येत नाही.. भजन,भारुड,कीर्तन याचा जयघोष चालू असतो. प्रत्येक दिंडी बरोबर त्यांचा ट्रक असतो ज्यात भांडी,अन्यधान्य, तंबू अस भरलेलं असत, आधीच तंबू कुठे करायचा ते ठरलेलं असत, आजच्या भाषेत बोलायचं तर परफेक्ट मॅनेजमेंट😊.....

खऱ्या वारकऱ्यांच्या गरजा खूप कमी आहेत, माझ्यामते दोन,तीन जोडी च कपडे घेऊन येत असतील,तीच धून,वाळवून जिथे पाणी मिळेल आणि विहीर असेल तिथेच अंघोळ...  गरजाच खूप कमी घेऊन येतात बरोबर..आणि त्या कमी ठेवल्या तरच तुम्ही 20,21 दिवस काढू शकता, तुम्हाला तुमच्या  सो कॉल्ड सवई घरी ठेवून यावं लागत ,हे मात्र 100% खरं.
जिथे जशी जागा मिळेल तिथे तुम्हाला तस असावं लागतं.(हे  शहरी लोकांसाठी आहे)

 वारकऱ्यांना साठी  सेवाभावी मंडळ,कार्यकर्ते,गावातील माणसं, राजकारणातील मंडळी अशी अनेक जण खाऊ,उपवासाचे पदार्थ,जेवण देत असतात.. त्यात थोडी खटकणारी गोष्ट म्हणजे  अन्न खूप वाया जात....भरभरून घेत असतात,रस्त्यात खूप घाण होते,बिस्किटाचे पुढे,केळीच्या सालांचा तर खच पडलेला असतो. ज्या ठिकाणी डाळतांदुळाची खिचडी वाटप असते तिथेतर रस्त्यावरून पाय घसरतो..खूप वाईट वाटत एकीकडे गरिबी बघतो तर दुसरी कडे हे अस वाया गेलेलं अन्न, मी स्वतः ती खिचडी खाल्ली होती,अहो काय ती चव...सुंदरच।  ..ताट नको,चमचा नको,बसायला खुर्ची नको...एका हातात पत्रावळी आणि दुसरा हात मनसोक्त चव घ्यायला😊..

एक गावाहून दुसऱ्या गावात पालखी जाते त्या रस्त्यावर तुम्हाला वेगवेगळे  व्यवसाय बघायला मिळतात....उसाचा रस,भजी वडे,चपला,कपडे,बिडी काडी अहो हल्ली तर मोबाईल चार्जिंग पण करून मिळतात...मजा आली हे सगळं अनुभवताना... शॉपिंग केल्याचा आनंद😊

त्या त्या गावात जत्रेचे स्वरूप असत...झोपाळे, फिरते पाळणे,खेळणी,बांगडया अनेक गमती जयंती...खायची चंगळ रेवडी,फरसाण,चिरमुरे...किती आणि काय...

एक एक दिवस करत पालखी पुढे जात असते...
गावातील वातावरण च गजरमय झालेलं असत...

एक टप्पा येतो तो म्हणजे रिंगण....  
ह्याची डोळा पाहिल्या मी सोहळा...अशी एक अनुभूती आहे ती... लोकांना ऊन म्हणू नका,पाऊस म्हणू नका ,कशाचाच फरक पडत नसतो त्यावेळी...फक्त माऊली च्या अश्वाचे दर्शन हे एकच पहायचे असते..आणि बघता बघता आपल्या समोरून तो सजवलेला अश्व तीन रिंगण घेतो..काय ते दृश्य असते..जणू खरंच त्यावर माऊलीच आरूढ झालेली आहे किंवा ती शक्ती त्या अश्वाला देखील दिमाखदार पणे पळवत असेल...
फक्त एक दैवी चमत्कार अस मी म्हणेन...काही गोष्टींच्या खोलात न शिरता.. त्याच्या अस्तितवाला स्वीकारणे जास्त चांगले.....

लिहिण्या सारख खूप आहे...गेली कित्येक वर्षाचा तो अनुभव आहे...मी एक त्या वारुळातील मुगीं...
हे मात्र नक्की ..देव आपल्याला बोलवत नाही तो पर्यंत आपण वाट बघणे हेच खरे मग ते वारी असो किंवा आयुष्याचा शेवट असो....🚩🙏🚩

Comments

  1. Sundar shabdat vicharanchi mandani...khup chan

    ReplyDelete
  2. Mansi khare ahe khoop chan lihale ahes pratek shabd na shabd barobar ahe mi ti vari anubhavali ahe shahari lokana thoda tras hoto pan tya varkarina ani palakhi na baghun sagala kshin nighun jato ani kal te rikame raste lok nahi ani ringanacha video pahun dolyat pani ale

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  7. Sunder. Tujya barobar Vaari la gelya sarkhe vatle.

    ReplyDelete
  8. Too good Manasi.....keep it up

    ReplyDelete
  9. खूप छान वर्णन व अनुभव मानसी, एक नकी आहे की, जोपर्यत आपल्या अंत करणातून इच्छा होत नाही, तो पर्यत दर्शन होत नाही. जेव्हा त्याची इच्छा असते, तेव्हा क्षणाचा ही विलंब होत नाही

    ReplyDelete
  10. Sarva pratham tuze lhupkkhup Abhinsndan ya navin upkramadathi...,😊
    Khup chan lihila ahes...
    Dolyasamor laggech drushya ali😊..
    Parat laukarach tuzya kadun kahi vachala avadel...
    All The Best👍

    ReplyDelete
  11. Manisha!Pahilyanda khupp Abhinandan 🎉 farach chaan lihile aahe. Mi swatha magachya varshi 'Wari' cha anubhav ghetala. aagdi tantotant varnan.mazhya sathi 'Wari' ek Anubhuti hoti. Great!! pudhchya block sathi Subheccha 👍

    ReplyDelete
  12. Dear Mansi,
    You are really lucky to have experienced this mesmerizing voyage. Blessed people get such opportunities and you're indeed one of them.  You have profundly expressed your thoughts through this blog and I'm lucky to have a versatile friend like you. Extremely proud of you. All the best for your future endeavors.

    Best Regards,
    Uma Mahesh Mudda

    ReplyDelete
  13. Agdi pratyaksya vari la gelya sarkhe watale tai. Agdi sahaj sope aani oghavate varnan.
    Ek sundar anubhav . 🙏🙏

    ReplyDelete
  14. खुप छान मानसी. तुझे खुप कौतुक. 🙏

    ReplyDelete
  15. खूप छान लिहिलं आहेस. मी स्वतः याचा अन7भाव घेतला आहे त्यामुळे ते जास्तच भावल

    ReplyDelete
  16. दीदी, ये पढ़ते समय आप का चेहरा आँखों के सामने आ गया, बहुत सुन्दर अनुभव लिखा आपने.

    ReplyDelete
  17. खूप खूप छान लिहिलं आहेस.
    चांगला आणि वाईट (अन्नाची नासाडी )
    असे दोन्ही अनुभव लिहिल्यामुळे जास्त
    चांगल वाटलं. Keep it up

    ReplyDelete
  18. Waah...khup chaan. 👌
    Eagerly Waiting for the next post

    ReplyDelete
  19. फारच छान लिहिले आहेस. नवीन उपक्रमास शुभेच्छा

    ReplyDelete
  20. Apratim!!!!
    Khup surekh anubhav... ek ek shabd mala vari la net hota ... kiti chan vatate ... Vithu mauli la ekch prarthana mala lavkarch tuzya sobat vari karnyachi sandhi milu de 🙏🙏

    ReplyDelete
  21. वारीचा अनुभव घेतला असे वाटले 👌

    ReplyDelete
  22. एक तरी वारी अनुभवावी...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

।।देवाचिये द्वारी उभा क्षणभरी।।

मागचे बरेच दिवस आपण विठू रखुमाईच्या जणू आजूबाजूला वावरत होतो,  एकीकडे वारी होणार नाही माहीत होतं तरी  मन  भक्ती करायला कमी पडत नव्हतं....  tv वर भजन ,कीर्तनाचा आनंद घेता येत होता, कोण हरिपाठ वाचत होत,तर कोणी विष्णूसहस्त्र नाम रोज  न चुकता म्हणत होत,  कुणी आपल्या  ग्रुपवर काही धार्मिक वाचनाचा उपक्रम  हाती घेतला होता . एकादशी दुप्पट खाशी 😝...उपवासाच्या पदार्थांची रेलचेल चालू होती ,सगळीकडे वेगवेगळ्या कृती दाखवल्या जात होत्या.... त्यातून देखील कुणीतरी  विठुराया तयार केला😇 आपल्या आपल्या भक्तीने  कोणी चित्र रंगवलं, तर कोणी सुरेल आवाजात भक्ती संगीत ऐकवलं,  अभंगा वर नृत्य सादर केलं....आणि असा आपला दिवस त्या सावळ्याच्या  नामघोषात  पार पडला.... प्रत्येकानी एकच मागण मागितलं असणार  आहे हे नक्की🙏 आज उगीचच एकदम शांत वाटत.. थोडीशी उदासी येऊन जाते... समजत नाही ,पण ... एक रिकामपण  वाटत. आणि परत जेव्हा एखादा अभंग  कानावर पडतो किंवा गुणगुणला जातो ... की परत एक  *संजीवनी*  मिळाल्याचा आनंद होतो...😇 ।।...

मनःशांती..दृष्टिकोन आपला,नजर आपली.

आज गेले होते खरेदीला ला.. " मनशांती" कुठे मिळते का ते बघायला... ********************** एक दुकानदार म्हणाला, "आमच्या कडे नाही.. त्या समोरच्या दुकानात विचारा" तिथे जाऊन चौकशी केली तर.. दुकानदार  हसून  म्हणाला .. " अस  काही विचारा जे  समजेल  मला" *********************** अशी दोन चार दुकान शोधून झाली.... मनशांती कुठेच नाही मिळाली.. *********************** अचानक ....... एका दुकानाच्या बाहेर लिहली होती पाटी  फक्त नाव सांगा  पाहिजे ते मिळेल. ...... वाचून खूप आनंद झाला😊 विचारून तर बघू  आहे की नाही  हे तरी कळेल.... ******************* दोन पायरी वर गेल्यावर दुसरी पाटी दिसली 😊 हसत मुखाने आत या " लिहल होत त्यावर"   बाहेरच  ठेवा  तुमचा  "राग  आणि  तेवर "😡🤨 *********************** वाचून थोडा विचार केला बघू तरी करून..... चप्पल👡बरोबर काढून ठेवला   मनाचा एक  टोचणार त्रिकोण....🔺 ********************* दार आत ढकला  लिहल होत  पुढच्या पाटीवर...⤴️ मनाचा पण कप्पा   हलकेच उघडा  आपल्या ...

Shambhar varsha purvi....

आज  जाहली  100वर्षे  पूर्ण  अनंतात विलीन होऊन..... नांव असे स्वातंत्र्यविराचे "केशव गंगाधर टिळक" किर्तीस आला  *बाळ*  नाव घेऊन..... रत्नागिरी जिल्हा,दापोली तालुका.. चिखली गावात जन्म घेतला गंगाधर-पार्वती दाम्पत्या पोटी..... लहानपणी अन्याय सहन न करणे  आणि कुशाग्र बुद्धी... "मी शेंगा खाल्या नाहीत मी टरफल उचलणार नाही"....इथं पासून "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" ....इथं पर्यँत लहान वयात हरपले   मातेचे छाया छत्र..... वय वर्ष सोळा, विवाह बंधनात अडकले दहा वर्षाच्या तापीबाई समवेत पित्याचा आशिर्वाद मिळाला मात्र... पोहणे,व्यायाम करणे,नौका चालवणे.. संस्कृत आणि गणित विषय आवडणे.... काही दिवस शिक्षकी पेशा  पैशासाठी निवडणे... B.A. , L L B पदवी घेता जागी झाली देशभक्ती.... इंग्रज सरकार राज्य खुपू लागले वाटू लागले का असावी अशी ही सक्ती.... घेतला वसा स्वातंत्र्याचा सामान्य लोका समजावे म्हणून.....  केली उभारणी शाळा,कॉलेजची परखड पणे मते मांडली  मराठा व केसरी वृत्तपत्रातून..... समाजातील दोन्ही पिढ्या असाव्या एकत्र...