।।माऊली,माऊली,माऊली..।।
"या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला"...केशवदास ह्यांचा हा अभंग खरंच अनुभवास येतो जेव्हा पायी चालणाऱ्या वारीतले आपण एक वारकरी असतो. त्या विठोबा रखुमाईची ओढ लागलेली असते....
मी स्वतः हा अनुभवलेला अनुभव माझ्या शब्दात लिहिण्याचा एक प्रयत्न.
आळंदी ते पंढरपूर ज्ञानेश्वर माऊलीची पालखी हा एक सुंदर प्रवास आहे... तसतर जे पायी पूर्ण वारी करतात ते अवघड,किचकट आणि वेदनादायी आहे...मात्र एक ओढ च ती पूर्ण करून घेते...
खूप लिहण्या सारख आहे...माऊली माऊली माऊली शिवाय काही ऐकू येत नाही.. भजन,भारुड,कीर्तन याचा जयघोष चालू असतो. प्रत्येक दिंडी बरोबर त्यांचा ट्रक असतो ज्यात भांडी,अन्यधान्य, तंबू अस भरलेलं असत, आधीच तंबू कुठे करायचा ते ठरलेलं असत, आजच्या भाषेत बोलायचं तर परफेक्ट मॅनेजमेंट😊.....
खऱ्या वारकऱ्यांच्या गरजा खूप कमी आहेत, माझ्यामते दोन,तीन जोडी च कपडे घेऊन येत असतील,तीच धून,वाळवून जिथे पाणी मिळेल आणि विहीर असेल तिथेच अंघोळ... गरजाच खूप कमी घेऊन येतात बरोबर..आणि त्या कमी ठेवल्या तरच तुम्ही 20,21 दिवस काढू शकता, तुम्हाला तुमच्या सो कॉल्ड सवई घरी ठेवून यावं लागत ,हे मात्र 100% खरं.
जिथे जशी जागा मिळेल तिथे तुम्हाला तस असावं लागतं.(हे शहरी लोकांसाठी आहे)
वारकऱ्यांना साठी सेवाभावी मंडळ,कार्यकर्ते,गावातील माणसं, राजकारणातील मंडळी अशी अनेक जण खाऊ,उपवासाचे पदार्थ,जेवण देत असतात.. त्यात थोडी खटकणारी गोष्ट म्हणजे अन्न खूप वाया जात....भरभरून घेत असतात,रस्त्यात खूप घाण होते,बिस्किटाचे पुढे,केळीच्या सालांचा तर खच पडलेला असतो. ज्या ठिकाणी डाळतांदुळाची खिचडी वाटप असते तिथेतर रस्त्यावरून पाय घसरतो..खूप वाईट वाटत एकीकडे गरिबी बघतो तर दुसरी कडे हे अस वाया गेलेलं अन्न, मी स्वतः ती खिचडी खाल्ली होती,अहो काय ती चव...सुंदरच। ..ताट नको,चमचा नको,बसायला खुर्ची नको...एका हातात पत्रावळी आणि दुसरा हात मनसोक्त चव घ्यायला😊..
एक गावाहून दुसऱ्या गावात पालखी जाते त्या रस्त्यावर तुम्हाला वेगवेगळे व्यवसाय बघायला मिळतात....उसाचा रस,भजी वडे,चपला,कपडे,बिडी काडी अहो हल्ली तर मोबाईल चार्जिंग पण करून मिळतात...मजा आली हे सगळं अनुभवताना... शॉपिंग केल्याचा आनंद😊
त्या त्या गावात जत्रेचे स्वरूप असत...झोपाळे, फिरते पाळणे,खेळणी,बांगडया अनेक गमती जयंती...खायची चंगळ रेवडी,फरसाण,चिरमुरे...किती आणि काय...
एक एक दिवस करत पालखी पुढे जात असते...
गावातील वातावरण च गजरमय झालेलं असत...
एक टप्पा येतो तो म्हणजे रिंगण....
ह्याची डोळा पाहिल्या मी सोहळा...अशी एक अनुभूती आहे ती... लोकांना ऊन म्हणू नका,पाऊस म्हणू नका ,कशाचाच फरक पडत नसतो त्यावेळी...फक्त माऊली च्या अश्वाचे दर्शन हे एकच पहायचे असते..आणि बघता बघता आपल्या समोरून तो सजवलेला अश्व तीन रिंगण घेतो..काय ते दृश्य असते..जणू खरंच त्यावर माऊलीच आरूढ झालेली आहे किंवा ती शक्ती त्या अश्वाला देखील दिमाखदार पणे पळवत असेल...
फक्त एक दैवी चमत्कार अस मी म्हणेन...काही गोष्टींच्या खोलात न शिरता.. त्याच्या अस्तितवाला स्वीकारणे जास्त चांगले.....
लिहिण्या सारख खूप आहे...गेली कित्येक वर्षाचा तो अनुभव आहे...मी एक त्या वारुळातील मुगीं...
हे मात्र नक्की ..देव आपल्याला बोलवत नाही तो पर्यंत आपण वाट बघणे हेच खरे मग ते वारी असो किंवा आयुष्याचा शेवट असो....🚩🙏🚩
Khup Chaan!!
ReplyDeleteSundar shabdat vicharanchi mandani...khup chan
ReplyDeleteNice experience
ReplyDeleteMansi khare ahe khoop chan lihale ahes pratek shabd na shabd barobar ahe mi ti vari anubhavali ahe shahari lokana thoda tras hoto pan tya varkarina ani palakhi na baghun sagala kshin nighun jato ani kal te rikame raste lok nahi ani ringanacha video pahun dolyat pani ale
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteSunder. Tujya barobar Vaari la gelya sarkhe vatle.
ReplyDeleteToo good Manasi.....keep it up
ReplyDeleteखूप छान वर्णन व अनुभव मानसी, एक नकी आहे की, जोपर्यत आपल्या अंत करणातून इच्छा होत नाही, तो पर्यत दर्शन होत नाही. जेव्हा त्याची इच्छा असते, तेव्हा क्षणाचा ही विलंब होत नाही
ReplyDeleteSarva pratham tuze lhupkkhup Abhinsndan ya navin upkramadathi...,😊
ReplyDeleteKhup chan lihila ahes...
Dolyasamor laggech drushya ali😊..
Parat laukarach tuzya kadun kahi vachala avadel...
All The Best👍
Manisha!Pahilyanda khupp Abhinandan 🎉 farach chaan lihile aahe. Mi swatha magachya varshi 'Wari' cha anubhav ghetala. aagdi tantotant varnan.mazhya sathi 'Wari' ek Anubhuti hoti. Great!! pudhchya block sathi Subheccha 👍
ReplyDeleteDear Mansi,
ReplyDeleteYou are really lucky to have experienced this mesmerizing voyage. Blessed people get such opportunities and you're indeed one of them. You have profundly expressed your thoughts through this blog and I'm lucky to have a versatile friend like you. Extremely proud of you. All the best for your future endeavors.
Best Regards,
Uma Mahesh Mudda
Khup chhan lihilasa.👍
ReplyDeleteAgdi pratyaksya vari la gelya sarkhe watale tai. Agdi sahaj sope aani oghavate varnan.
ReplyDeleteEk sundar anubhav . 🙏🙏
Khup chan lihilay
ReplyDeleteखुप छान मानसी. तुझे खुप कौतुक. 🙏
ReplyDeleteखूप छान लिहिलं आहेस. मी स्वतः याचा अन7भाव घेतला आहे त्यामुळे ते जास्तच भावल
ReplyDeleteदीदी, ये पढ़ते समय आप का चेहरा आँखों के सामने आ गया, बहुत सुन्दर अनुभव लिखा आपने.
ReplyDeleteखूप खूप छान लिहिलं आहेस.
ReplyDeleteचांगला आणि वाईट (अन्नाची नासाडी )
असे दोन्ही अनुभव लिहिल्यामुळे जास्त
चांगल वाटलं. Keep it up
Waah...khup chaan. 👌
ReplyDeleteEagerly Waiting for the next post
फारच छान लिहिले आहेस. नवीन उपक्रमास शुभेच्छा
ReplyDeleteApratim!!!!
ReplyDeleteKhup surekh anubhav... ek ek shabd mala vari la net hota ... kiti chan vatate ... Vithu mauli la ekch prarthana mala lavkarch tuzya sobat vari karnyachi sandhi milu de 🙏🙏
Khup chaan 😊😇🙏
ReplyDeleteवारीचा अनुभव घेतला असे वाटले 👌
ReplyDeleteएक तरी वारी अनुभवावी...
ReplyDeleteKhup chaan
ReplyDeleteKhup sundar lihilay ,keep it up .
ReplyDelete