आजच्या विषयाला धरून एक विचार मांडते✒️
" *Work from Home*"
असा इंग्लिश शब्द वापरला की खूप मोठं काही तरी केलं का?.. तर तस नाही
..काही का होईना काम चालू राहील आणि incom देखील
बरोबर ना.......❓
(मत चूक किंवा बरोबर काही असू शकत)
मग मला सांगा
वर्षानुवर्षं घरात राहून...
जी काम करते ..
तिला काय पदवी?
तिचा पगार कुठे?
तीच स्थान काय?
तर उत्तर हे की....
ती घरातच असते
सो कोल्ड भाषेत बोलायचं तर....
*House wife*🏠.
वर्क फ्रॉम होम, लॉक डाऊन
हे सगळे शब्द तिच्या साठी नवीन नाहीयेत ....
तुम्ही कामावर गेलात
की घरात ती लॉक डाऊन च असते ..
आणि वर्क फ्रॉम होम सुरू होत .
केला ह्याचा विचार..
बाहेर जाऊन काम करून येता...
घरासाठी पैसे कमवता...
पण आज ज्यावेळी हॉटेल बंद झाली...
पोळी भाजी केंद्र बंद झाली...
तेव्हा हीच होती...
जी work from home
नाही तर ...
Work for home....
करत होती.
मग परिस्थिती प्रमाणे...
भांडी, धुणं, केर ,फरशी सगळंच
*फॉर होम* साठी चालू होतं.
*जिच्या वर इतके जोक करता...*
ती तर दिवसभर घरात एकटी असते
किंवा तुमच्या आई बरोबर
(अभिप्रेत ..सासू,ती पण अशीच lokcdown स्त्री)
घरातील बाकी मंडळी...
आता विभक्त कुटुंब पद्धती आली आहे
नाहीतर पूर्वी किती माणसं घरात असायची
किती काम करावी लागत असतील
आता च्या सारख्या सोई थोड्याच होत्या...
तरी पण तुम्ही घरात बसून काय करता..??
*हो आम्ही lok down असतो आणि वर्क फ्रॉम होम करतो*
मागचे काही महिने आपण तर सगळे एकत्र घरात होतो.....
ती तर दिवसभर एकटी घरात असते..
tv, मोबाईल, पेपर हेच तर तिचे सोबती असतात... घर आवरणे,भाजीपाला,आलेलं गेलेलं,सण वार,पै पाहुणा..खूप गोष्टी आहेत ओ.
कामावर गेलेली आपली माणस
परत घरी कधी येतील
ह्याची वाट बघत बसणे...
कारण दिवसभर
lokc down
वर्क फ्रॉम होम
असलं तरी,
फ्रेश होऊन तुमची वाट बघायची असतेच ना...
तिचा lokc down कधी संपत च नाही
वर्क फ्रॉम home तिला काही नवीन नाही..
कारण तुम्हाला एक दिवस सुट्टी असते
तेव्हा घरी राहायचं असत ...
तिला मात्र
lok down
आणि
work from home
मधून बाहेर पडायचं असत..
एवढ असून देखील..तिला समाधान हेच असत की ...
बाहेर जाऊन,दिवस भर खपणाऱ्या, दमणाऱ्या आपल्या व्यक्ती मुळेच...
आज मी बिनधास्त मधे माझ्या घरात
*lok down* आहे.
*Work from Home*
म्हणा किंवा..
*Work for Home*
😊😊
आनंदाने करते आहे
समाधानाने जगते आहे
माझं कर्तव्य मी करते आहे
कारण....
*मानसी गोरे*
😊😊
एक House Wife.
खूप छान लिहिलंय...हा विचार खूप कमी वेळा केला जातो.
ReplyDeleteखरं आहे.
ReplyDeleteखरं आहे तुमचं.... छान मांडले आहेत...
ReplyDeleteखरं आहे, प्रत्येक स्त्री चे मत .
ReplyDelete