आजचा ब्लॉग हा ह्याच विषयावर लिहला पाहिजे...
।। दिव्या दिव्या दिपत्कार ।।
।।दिव्याला पाहून नमस्कार ।।🙏
आपल्या सगळ्यांन कडे एक पोस्ट येत होती... आली असेलच .
ती अशी की...आजच्या दिवसाला गटारी गटारी म्हणू नका..
खरतर आजचा दिवस "दीप अमावस्या" म्हणून आपल्या संस्कृती मधे पूर्वापार चालत आला आहे...दिव्याला खूप महत्व दिले आहे.
म्हणून अस वाटलं....
ह्यावेळी हे बर झालं की ज्याला जो काय धिंगाणा घालायचा आहे त्यासाठी रविवार मिळाला
आणि
आज आपल्याला
"सोमवती दीप अमावस्या" मिळाली.
दिव्यांनी ओवाळणे हे सौख्याच प्रतीक मानलं जातं...
इतिहासात देखील
लढाईला निघालेला योध्या असो
एखादा विजय संपादन केलेला ...तसच
पाडवा, भाऊबीज, पंचाहत्तरी, सहस्त्र चंद्र दर्शन,
किंवा आपल्या बाळाचा पहिला वाढदिवस.😘
मोबाईल मधील फोटो मुळे वेगवेगळ्या दिव्यांची मांडणी बघायला मिळाली, दिवे बघायला मिळाले..... छान वारसा पुढे जातोय हे नक्की.
आजच्या दिवसाला काय महत्व आहे त्याची एक गोष्ट वाचनात आली, ती पुढे लिहिते...
या पूजाव्रताची कथा खालीलप्रमाणे सांगितली आहे.
तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन मुले होती. लहानपणीच दोघांनी असं ठरविले की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला तीन मुली व विनीताला तीन मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनीताचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला. भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली. नंतर सगुणेचा विचार करू लागली. गौरीने (आईने) भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणेला वाईट वाटले. तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरविले. गौरी तिच्यावर संतापली. परंतु तिने हेका सोडला नाही. लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली. गरिबीतच संसार सांभाळू लागली. एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली. अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली. नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर माग, असे सांगितले. सगुणेने मागितले की, ‘फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसर्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा.’’ राजाने तसे केले. मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले. तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणार्या सवाष्ण बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणार्या बाईकडून परत येणार नाही, अशी शपथ घाल. त्याप्रमाणे त्यांनी केले. अशारितीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व अवदसा घरातून निघून गेली. या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले. राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले. अशी ही कथा दीप अमावास्येसाठी सांगितली आहे.
कदाचित अजून पण कथा प्रचलित असतील
छान वाटली,वाचनात आली
म्हणून आपल्या बरोबर शेअर केली🙏
तुम्ही छान लिहिता! लिहीत रहा
ReplyDeleteKuph chan pahilyandach katha Vachli...💐🌹
ReplyDeleteCHAAAN
ReplyDeleteKhup chan mahiti sangitlit.. Uttam lekhan👌👌👌
ReplyDeleteChan
ReplyDeletephar surekh.
ReplyDelete👌👌
ReplyDeleteछान.. drawing मात्र फारच छान
ReplyDeleteखुप छान माहीती..
ReplyDeleteछान, सहज आणि प्रवाही....
ReplyDeleteKhup chan ... u express the topic with very nice n simple way with this story !!!
ReplyDeleteDrawing of SAMAI sunder👌👌
Dip Jyoti Namostute 🙏🙏
Great. Thought provoking!!
ReplyDelete